शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मेरठमधून ISI एजंट सत्येंद्र सिवाल अटकेत, ATS कडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 15:52 IST

सत्येंद्र हे दूतावासात भारताचे सर्वोत्तम सुरक्षा सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. 

मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातून एटीएसने एका आयएसआय एजंटला अटक केली. सत्येंद्र सिवाल असे या आयएसआय एजंटचे नाव आहे. सत्येंद्र हे २०२१ पासून रशियाची राजधानी मॉस्को येथील भारतीय दूतावासात तैनात आहेत. सत्येंद्र हे दूतावासात भारताचे सर्वोत्तम सुरक्षा सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. 

अटक करण्यात आलेल्या सत्येंद्र यांच्यावर भारतीय दूतावास, संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय लष्करी आस्थापनांची महत्त्वाची गोपनीय माहिती आयएसआय हँडलर्सना दिल्याचा आरोप आहे. एटीएसच्या चौकशीत सत्येंद्र यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. सत्येंद्र हे मूळचे हापूरचे आहेत. त्यांच्याकडून एटीएसने दोन मोबाईल फोन, आधार कार्ड आणि पॅनकार्ड जप्त केले. 

दरम्यान, उत्तर प्रदेश एटीएसला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे हँडलर परराष्ट्र मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना आमिष दाखवून आणि पैशाचे आमिष दाखवून हनी ट्रॅपिंग करत असल्याची माहिती मिळाली होती. उत्तर प्रदेश एटीएसने या इनपुटची चौकशी केली असता, सत्येंद्र सिवाल यांनी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला दिलेल्या माहितीच्या बदल्यात पैसेही पाठवण्यात आल्याचे आढळून आले. 

भारतीय लष्कराशी संबंधित अनेक महत्त्वाची आणि गोपनीय माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय एजंट्सच्या माध्यमातून गोळा केली जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, हापूरचे रहिवासी सत्येंद्र सिवाल हे परराष्ट्र मंत्रालयात एमटीएस या पदावर नियुक्त आहेत. ते सध्या रशियाची राजधानी मॉस्को येथे असलेल्या भारतीय दूतावासात कार्यरत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी