शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

...तर अटलजींना आवडणार नाही

By admin | Updated: October 7, 2015 09:26 IST

उत्तर प्रदेशातील दादरी हत्याकांडाबाबत जनमानसात उमटत असलेले तीव्र पडसाद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणावर बाळगलेले मौन या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण

लालकृष्ण अडवाणी : दादरीप्रकरणी मोदी सरकारला चिमटा; राजकारण तापले, आरोप-प्रत्यारोपआग्रा : उत्तर प्रदेशातील दादरी हत्याकांडाबाबत जनमानसात उमटत असलेले तीव्र पडसाद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणावर बाळगलेले मौन या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आग्रा येथील एका कार्यक्रमात मोदी सरकारला जोरदार चिमटा काढला. दादरीवर बोललो तर अटलजींना ते आवडणार नाही, असे सूचक विधान त्यांनी यावेळी केले.सोमवारी एका पुस्तक प्रकाशन समारोहासाठी अडवाणी आगऱ्यात आले होते. सध्या देशात जे काही सुरू आहे, ते भाजप सरकारच्या त्रुटी दाखवणारे आहे. या त्रुटी दूर करण्याची गरज आहे. सरकार या त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्नशील असले तरी आणखी बरेच काही करावे लागणार आहे, अशा शब्दात त्यांनी यावेळी मोदी सरकारवर ताशेरे ओढले.दादरीमध्ये गोमांस खाल्ल्याच्या अफवेतून जमावाने एका मुस्लिम व्यक्तीची हत्या केली होती. या घटनेमुळे केवळ उत्तर प्रदेश सरकारच नाही, तर केंद्र सरकारलाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दादरीची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत या घटनेची निंदा केली होती. याशिवाय अर्थमंंत्री अरुण जेटली यांनीही दादरी हत्याकांडामुळे देशाचे नाव खराब होत असल्याचे म्हटले होते.शर्मा, सोम यांच्याविरुद्ध एफआयआरची शिफारस...इखलाकच्या मृत्यूनंतर दादरीजवळील बिशादा या गावाला भेट देताना प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा आणि भाजपचे वादग्रस्त आमदार संगीत सोम यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची शिफारस केल्यामुळे नवा वाद उभा ठाकला आहे.उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी गौतम बुद्धनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या अहवालात शर्मा आणि सोम यांच्यासह बसपाचे माजी मंत्री नसीमुद्दीन सिद्दीकी यांच्यावरही कारवाई करण्याची शिफारस केली आहे. या तिन्ही नेत्यांनी गावकऱ्यांना संबोधित केल्यामुळे तेथे लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन झाल्याचा दावा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) संजयकुमार यादव यांनी केला. दादरी परिसरातील संवेदनशील परिस्थिती पाहता या नेत्यांना केवळ इखलाकच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती; मात्र त्यांनी जाहीरसभा घेत या नियमांचे उल्लंघन केले. निरपराधांवर गुन्हे दाखल केल्यास आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ असे चिथावणीजनक विधान केल्यामुळे मुझफ्फरनगरचे आमदार सोम याआधीच अडचणीत आले आहेत. एमआयएमचे खा. असदुद्दीन ओवैसी यांनी इखलाकच्या कुटुंबियांची भेट घेतल्याबद्दलही सोम यांनी कडाडून टीका केली होती. सोम यांच्या विधानाबद्दल कोणती कारवाई करायची याबाबत कायदेशीर मत मागण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी एन.पी.सिंग यांनी सोमवारी स्पष्ट केले होते.गोमांस तपासणीसाठी बंदरांवर प्रयोगशाळा : दादरी प्रकरण तापले असतानाच केंद्र सरकारने मंगळवारी गोमांसच्या बेकायदा निर्यातीला आळा घालताना बंदरांवर चाचणीसाठी प्रयोगशाळा स्थापन करण्याची घोषणा केली आहे. कृषी राज्यमंत्री संजीवकुमार बलयान यांनी कृषी निर्यात प्रोत्साहन मंडळ (अपेडा), अन्न प्रक्रिया मंत्रालय, तसेच कृषी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आढावा बैठकीत चर्चा केल्यानंतर ही माहिती दिली.