शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Atal Bihari Vajpayee : उदारमतवादी चेहरा आता केवळ स्मृतीतच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 04:18 IST

केंद्रात वाजपेयी सत्तेवर आहेत, तरीही राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारची काहीच मदत होत नाही, या कारणास्तव राम मंदिर आंदोलनातले समस्त महंत, साधू अन् विहिंपचे नेते सरकारवर संतापले होते.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : अटलबिहारी वाजपेयीपंतप्रधान असताना २00२ साली ७, रेसकोर्स या त्यांच्या निवासस्थानी घडलेला एक प्रसंग. केंद्रात वाजपेयी सत्तेवर आहेत, तरीही राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारची काहीच मदत होत नाही, या कारणास्तव राम मंदिर आंदोलनातले समस्त महंत, साधू अन् विहिंपचे नेते सरकारवर संतापले होते. विविध आखाड्यांचे महंत व साधू यांचे शिष्टमंडळ एके दिवशी वाजपेयींना भेटायला दिल्लीला आले. हा प्रसंग काही निवडक मराठी पत्रकारांना (केंद्रीय मंत्री प्रमोद महाजनांच्या सौजन्याने) प्रत्यक्ष पाहता आला. महंत व साधूंनी त्रागा व्यक्त करीत यावेळी वाजपेयींचे लक्ष राम मंदिराच्या विषयाकडे वेधले. एक तरुण साधू आक्रस्ताळ्या आवाजात म्हणाला, ‘वाजपेयीजी, हम सबने बचपनसे अखंड भारत का सपना देखा है। सत्ता के शीर्ष स्थानपर आप बैठे है। आप कुछ करते क्यों नही? हम ये उम्मीद अब छोड दे क्या? त्या तरुण साधूकडे पाहत वाजपेयींनी सवयीनुसार एक पॉज घेतला. समस्त साधू महंतांचे चेहरे नीट न्याहाळले. मग एका वाक्यात उत्तर देत म्हणाले, अखंड भारतका सपना देखते हो, जरा शांतीसे सोचो... अगर भूमी आयेगी, तो लोग भी तो आयेंगे, तब क्या करोगे? वाजपेयींचे उत्तर ऐकल्यावर सारे शिष्टमंडळ निरुत्तर झाले.वन लायनर म्हणजे एका वाक्यात उत्तर देण्यात वाजपेयींचा हातखंडा होता. भारतीय राजकारणात वाजपेयी भाजपचा अस्सल उदारमतवादी चेहरा होते. त्यांचे टीकाकार म्हणायचे की, कायम सौम्य स्मित झळकत असलेला वाजपेयींचा चेहरा हा केवळ मुखवटा आहे; त्यामागे रा.स्व.संघाचा हिंदुत्ववादी चेहरा लपलेला आहे. पण पक्षाच्या व्यासपीठावर वाजपेयी यांनी अडवाणींच्या रथयात्रेविरोधात भूमिका घेतली होती. गुजारात दंगलीबाबतही वाजपेयी म्हणाले होते की, ‘या घटनांबाबत केवळ विरोधकच व्यथित आहेत काय? केंद्र सरकारही तितकेच दु:खी आहे. सर्वांनाच शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे’.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीprime ministerपंतप्रधान