शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Atal Bihari Vajpayee Death: वाजपेयींच्या आयुष्याशी संबंधित 'या' सहा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 20:24 IST

Atal Bihari Vajpayee Death: भाजपाचे पहिले पंतप्रधान असलेल्या वाजपेयींना पक्षाला बहुमत मिळवून देता आलं नाही. मात्र सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे भारतीय राजकारणातील एक संयमी नेता अशी त्यांची ओळख आहे.

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तीनवेळा देशाचे पंतप्रधान झाले. मात्र यापैकी केवळ एकदा त्यांना पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला. भाजपाचे पहिले पंतप्रधान असलेल्या वाजपेयींना पक्षाला बहुमत मिळवून देता आलं नाही. मात्र सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे भारतीय राजकारणातील एक संयमी नेता अशी त्यांची ओळख आहे. वाजपेयी यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण गोष्टींवर एक नजर टाकूया...

1. पोखरणमधील अणू चाचणी: बहुतांश पंतप्रधानांनी भारताला महासत्ता करण्याची भाषा केली. मात्र अणूचाचणी करुन वाजपेयी यांनी जगाला भारताचं सामर्थ्य दाखवून दिलं. वाजपेयी पंतप्रधान असताना भारतानं पोखरणमध्ये एका पाठोपाठ एक पाच अणू चाचणी केल्या. अतिशय गोपनीयपणे या चाचण्या करण्यात आल्या होत्या. 2. पाच वर्ष सत्तेत राहिलेले पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान:अटल बिहारी वाजपेयी देशाचे असे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान आहेत, ज्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. याआधी कोणत्याही नेत्याला अशी कामगिरी करता आलेली नव्हती. 3. चार राज्यांमधून निवडून गेलेले खासदार:अटल बिहारी वाजपेयी अतिशय लोकप्रिय नेते आहेत. वाजपेयी यांच्या नावावर अनोखा विक्रम आहे. वाजपेयी चार राज्यांमधून लोकसभेवर गेले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि दिल्लीमधून लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.4. पहिल्यांदा आघाडी सरकारची स्थापना:अटल बिहारी वाजपेयी देशाचे पहिले असे नेते होते, ज्यांना आघाडी सरकार स्थापन करण्यात यश आलं. त्यांनी केवळ सत्तास्थापन केली नाही, तर सर्वांना सोबत घेऊन पाच वर्षांचा कार्यकाळदेखील पूर्ण केला. यामुळे भारतीय राजकारणाला महत्त्वपूर्ण वळण मिळालं. 5. संयुक्त राष्ट्रात हिंदीमध्ये भाषण :अटल बिहारी वाजपेयी यांना हिंदीविषयी विशेष प्रेम वाटायचं. त्यामुळेच पंतप्रधान म्हणून संयुक्त राष्ट्राला संबोधित करताना त्यांनी हिंदीचा आधार घेतला. असं करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. 6. भारतरत्न : 2015 मध्ये वाजपेयींना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्न प्रदान करण्यात आला. त्यांच्यासोबत पंडित मदन मोहन मालवीय यांनाही हा पुरस्कार देण्यात आला. 

(Atal Bihari Vajpayee: पत्रकार ते पंतप्रधानपदापर्यंतचा अटल बिहारी वाजपेयींचा राजकीय प्रवास)

(Atal Bihari Vajpayee: जाणून घ्या, अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दलच्या १० दुर्मिळ गोष्टी)

(Atal Bihari Vajpayee: अटलबिहारींचा 'आठ'वावा प्रताप; या गोष्टींसाठी सदैव ऋणी राहील भारत!)

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीAIIMS hospitalएम्स रुग्णालय