शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

Atal Bihari Vajpayee Death: अमेरिकेचा दबाव झुगारुन वाजपेयींनी केली पोखरणमध्ये अणुचाचणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 19:48 IST

Atal Bihari Vajpayee Death: 13 मे 1998 आणि 15 मे 1998 या काळात अमेरिकेला थांगपत्ता लागू न देता वाजपेयी सरकारने पोखरणमध्ये जमिनीखाली 5 अणुचाचण्या घेतल्या. सत्ता प्राप्तीनंतर वाजपेयींनी घेतलेल्या चाचण्यांनी जगभरात खळबळ उडाली होती.

नवी दिल्ली : अटलबिहारी वाजपेयीच्या कार्यकाळात भारतानं एक यशस्वी पाऊल उचललं. 1995च्या वाजपेयी सरकारनंतर 1996 ते 98दरम्यान तिसऱ्या आघाडीला सरकार स्थापनेच्या दोन संधी मिळाल्या. देवैगोडा आणि इंद्रकुमार गुजराल भारताचे पंतप्रधान झाले. ही दोन्ही सरकारे फार काळ टिकली नाहीत. त्यानंतर 1998च्या निवडणुकांत भाजपा पुन्हा सत्तेचा प्रबळ दावेदार झाला आणि वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 

भाजपाने इतर पक्षांसोबत मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार स्थापलं. परंतु 1998च्या अखेरीस अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी रालोआचा पाठिंबा काढला आणि वाजपेयी सरकार कोसळलं. त्यानंतर विरोधी पक्षसुद्धा सरकार स्थापन करू शकला नाही व अखेर भारतात पुन्हा लोकसभा निवडणुका लागल्या. त्यावेळी वाजपेयी हे काळजीवाहू पंतप्रधान बनले. 1998मध्ये रालोआचं सरकार असताना वाजपेयींनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. 13 मे 1998 आणि 15 मे 1998 या काळात अमेरिकेला थांगपत्ता लागू न देता वाजपेयी सरकारने पोखरणमध्ये जमिनीखाली 5 अणुचाचण्या घेतल्या. सत्ता प्राप्तीनंतर वाजपेयींनी घेतलेल्या चाचण्यांनी जगभरात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे अमेरिकेला हा मोठा धक्का होता. कारण भारतानं या चाचण्या अमेरिकेच्या हेरगिरी करणा-या उपग्रहाला चुकवून केल्या होत्या. त्यानंतर 2 आठवड्यांत पाकिस्ताननेही अणुचाचण्या केल्या. रशिया आणि फ्रान्स यांनी भारतानं स्वसंरक्षणासाठी आणि शांततापूर्ण उपयोगासाठी घेतलेल्या अणुचाचण्यांचं समर्थन केलं, तर अमेरिका, कॅनडा, जपान, इंग्लंड, युरोपिय महासंघानं भारताच्या चाचण्यांना विरोध दर्शवून अनेक निर्बंध लादले. परंतु वाजपेयींच्या आर्थिक धोरणांमुळे भारताला याचा फारसा फटका बसला नाही.

या पोखरणच्या अणुचाचण्या भाजपा आणि वाजपेयींसाठी फायदेशीर ठरल्या. अटलजींच्या पंतप्रधानपदाची सहा वर्षे अत्यंत वादळी अशी होती. इंदिरा गांधींनंतर अणुचाचणी घेण्याचे धाडस दाखवणारे दुसरे पंतप्रधान म्हणजे अटल बिहारी वाजपेयी ठरले होते. जय जवान, जय किसानसह वाजपेयींनी जय विज्ञान असा नवा नारा देशाला बहाल केला होता. भारताला अण्वस्त्रांनी सुसज्ज करण्यात वाजपेयींचा मोठा वाटा होता. जागतिक दबाव आणि निर्बंधाची त्यांनी कधीही तमा बाळगली नव्हती. त्यामुळेच भारताला एवढं मोठं यश मिळवता आलं. पाकिस्तान, चीन या सारखे बेभरवशाचे शेजारी देश असताना अण्वस्त्र सज्ज होणं ही भारताची गरज होती. अणुचाचणी घेऊन वाजपेयींनी अख्ख्या जगाला भारतीय लष्कराचं सामर्थ्य दाखवून दिले.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी