शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

Atal Bihari Vajpayee : वो सुबह कभी तो आएगी..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 05:30 IST

अटलबिहारी वाजपेयी यांचा खासदार म्हणून दिल्लीशी संपर्क आला तो १९५७ साली. त्या वेळी ते व त्यांचे सहकारी चांदणी चौक, पहाडगंज, अजमेरी गेट ते झंडेवाला अशा ठिकाणी नेहमी जात असत.

नवी दिल्ली - अटलबिहारी वाजपेयी यांचा खासदार म्हणून दिल्लीशी संपर्क आला तो १९५७ साली. त्या वेळी ते व त्यांचे सहकारी चांदणी चौक, पहाडगंज, अजमेरी गेट ते झंडेवाला अशा ठिकाणी नेहमी जात असत. चांदणी चौकात त्यांचे वास्तव्य होते. सुमारे ६० वर्षे अटलजींचे दिल्लीशी ॠणानुबंध होते. वाजपेयी देशाचे नेते होते. लोकप्रिय होते. दिल्लीवर त्यांचे विशेष प्रेम. इथले गल्लीबोळ त्यांना माहीत होते. खाऊगल्ल्यांपासून ते चित्रपटगृहांपर्यंत वाजपेयींची फिरस्ता असे.अटलजी व जगदीश प्रसाद माथुर जनसंघातर्फे प्रथमच निवडून आले होते. दोन्ही नेते चांदणी चौकातच छोट्याशा खोलीत राहात असत. जवळ फारसे पैसे नसायचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते व पुढे पूर्णवेळ राजकारणी असल्याने वाजपेयींकडे पैसे नसतच. त्यामुळे खासदार असतानाही ते पायीच संसदेत येत. खासदार झाल्यानंतर सहा महिन्यांनी अटलजींनी पहिल्यांदा त्यांच्या या सहकाऱ्यास रिक्षाने संसदेत जाऊ , असे सांगितले. माथुर यांना आश्चर्य वाटले. खासदारपदाचे सहा महिन्यांचे एकत्रित वेतन मिळाल्यानेच रिक्षाची चैन करण्याची इच्छा वाजपेयींनी व्यक्त केली. जनसंघ-भाजपाच्या विस्तारासाठी वाजपेयींनी सायकलवरून अनेक शहरे पिंजून काढली. त्यांचा साधेपणा दिल्लीतही कायम राहिला.त्यांच्यासोबत १९५३पासून असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांना त्या गोष्टी आजही लख्खपणे आठवतात. त्या वेळी जनसंघाचे कार्यालय अजमेरी गेट येथे होते. अडवाणी आणि अटलजी नेहमी अजमेरी गेट ते झंडेवालापर्यंत टांग्यातून भोजनासाठी जात असत.दिल्लीजवळील नयाबांस येथील पोटनिवडणुकीत जनसंघाला यश मिळाले नाही. त्या वेळी त्यांनी निराश झालेल्या अडवाणी यांना जवळच्याच पहाडगंजमध्ये चित्रपट पाहण्यासाठी नेले. तेथे कोणता चित्रपट प्रदर्शित झाला होता, ते दोघांनाही माहीत नव्हते. राज कपूर यांचा ‘वो सुबह कभी तो आएगी’ हा चित्रपट सुरू होता. त्या चित्रपटाचा फलक पाहून अडवाणी वाजपेयींना म्हणाले, ‘हम आज हार गये, लेकिन देखना, वो सुबह फिर जरुर आएगी.’ आणि खरोखरच जनसंघाच्या काळात नव्हे, तरी भाजपासाठी ती सुबह आली आणि वाजपेयी पंतप्रधानही झाले!

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीPoliticsराजकारण