शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलच! मोठ्या भावाच्या लग्नात ऐनवेळी धाकटा भाऊ 'नवरदेव', तरूणीच्या दाव्याने माजली खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 21:23 IST

उत्तर प्रदेशमधील संभल येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.

अलीगढ : उत्तर प्रदेशमधील संभलहूनअलीगढला निघालेल्या लग्नाच्या मिरवणुकीत एका मुलीने चांगलाच गोंधळ घातला. खरं तर मुलीच्या या गोंधळामुळे लग्नाच्या आनंदाचे रूपांतर वादात आणि तणावात झाले. मुलीने नवरदेवावर तिच्याशी प्रेमसंबंध असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच आणखी अनेक धक्कादायक खुलासे केले. या घटनेनंतर उपस्थितांमध्ये एकच खळबळ माजली.

माहितीनुसार, संभल जिल्ह्यातील गुन्नौर कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातून अलीगढला वऱ्हाड जाणार होते. लग्नाच्या मिरवणुकीची तयारी जोरात सुरू होती, पण तेवढ्यात दिल्लीहून एक मुलगी तिथे पोहोचली. मिरवणुकीत पोहोचलेल्या तरुणीने बराच गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि सांगितले की, पाच वर्षापूर्वी नवरदेव असलेल्या तरुणासोबत तिचा प्रेमविवाह झाला होता. तो तरुण आधी दिल्लीत तिच्यासोबत राहत होता, असा दावा संबंधित तरूणीने केला. 

तरूणीच्या दाव्याने माजली खळबळ मिरवणुकीत हायव्होल्टेज ड्रामा झाल्याने नवरदेव मुलाच्या बाजूने आणि परिसरातील लोकांनी मुलीला शांत केले. पण, मुलगी आपल्या म्हणण्यावर ठाम राहिली. त्यानंतर याबाबत पंचायत झाली. अनेक तासांच्या विचारमंथनानंतर पंचायतीने निर्णय देताना दोघांचे लग्न योग्य असून ते एकत्र राहणार असल्याचे सांगितले. 

मोठ्या भावाच्या ऐवजी धाकटा भाऊ 'मंडपात'मुलीच्या गोंधळानंतर पंचायतीने निर्णय घेतला की, वर बनलेल्या तरुणाचे आणि मुलीचे आधीच लग्न झाले होते. मात्र लग्नाची मिरवणूक मधीच अडकल्याने प्रकरण तणावाचे वातावरण तयार झाले. अशा परिस्थितीत कुटुंबीय आणि पंचायतीने वधू पक्षाशी चर्चा केली, त्यानंतर मोठ्या भावाऐवजी लहान भावाचे लग्न लावण्याचे ठरले. अशाप्रकारे पंचायतीच्या निर्णयानंतर मोठ्या भावाऐवजी धाकट्या भावाच्या डोक्यावर फेटा बांधून वऱ्हाड अलिगढला गेले.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशaligarh-pcअलीगढmarriageलग्नLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट