शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

संपूर्ण स्वदेशी ‘अस्त्र’ हवाईदलासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 04:36 IST

आवाजाहूनही अधिक वेगवान आणि हवेतील लक्ष्याचा हवेतूनच वेध घेऊ शकणारे ‘अस्त्र’ हे क्षेपणास्त्र लढाऊ विमानांवर बसवून प्रत्यक्ष वापर करण्यासाठी सज्ज झाले आहे.

नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) १५ वर्षांच्या खडतर प्रयत्नांनंतर विकसित केलेले आवाजाहूनही अधिक वेगवान आणि हवेतील लक्ष्याचा हवेतूनच वेध घेऊ शकणारे ‘अस्त्र’ हे क्षेपणास्त्र लढाऊ विमानांवर बसवून प्रत्यक्ष वापर करण्यासाठी सज्ज झाले आहे. भारतीय हवाई दल त्यांच्या ‘सुखोई-३० एमके आय’ लढाऊ विमानांच्या ताफ्यासाठी अशी किमान २०० क्षेपणास्त्रे सुरुवातीला घेईल, अशी ‘डीआरडीओ’ला आशा आहे.‘डीआरडीओ’चे प्रमुख डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी सांगितले की, सध्या जगात या श्रेणीची जी सर्वोत्तम क्षेपणास्त्रे उपलब्ध आहेत त्यात ‘अस्त्र’चा समावेश होतो. सध्या हे क्षेपणास्त्र ११० कि.मी.पर्यंत दूरवरच्या लक्ष्याचा वेध घेऊ शकते. ही क्षमता १६० कि.मी.पर्यंत वाढविण्याचे काम याआधीच सुरू करण्यात आले आहे.हल्ला परतविण्याची संपूर्ण सुसज्जता असलेले व अत्यंत वेगाने मार्गक्रमण करणाऱ्या हवेतील कोणत्याही लक्ष्याचा दूरवरून अचूक वेध घेऊ शकणारे असे क्षेपणास्त्र बनविण्याचेतंत्रज्ञान आत्मसात करणाºया अमेरिका, रशिया, फ्रान्स व इस्रायल या मोजक्या देशांच्या पंक्तीत आता भारताने स्थान पटकावले आहे. भारताने गेल्या २७ फेब्रुवारी रोजी बालाकोट येथील दहशतवादी प्रशिक्षण तळावर हल्ला केला तेव्हा आपल्या आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांची हवेत जी झटापट झाली तेव्हा अशा प्रकारच्या क्षेपणास्त्राचे महत्त्व अधोरेखित झाले होते.गेल्या आठवड्यात ‘डीआरडीओ’ने ओडिशात चांदीपूर किनाºयावरून ही ‘अस्त्र’ क्षेपणास्त्रे प्रत्यक्ष ‘सुखोई’ लढाऊ विमानांवर बसवून त्यांच्या पाच यशस्वी चाचण्या घेतल्या. त्या चाचण्यांमध्ये सर्व हवाई लक्ष्यांचा ८० ते ८६ कि.मी. अंतरावरून अचूक वेध घेण्यात आला. त्यामुळे आता ही क्षेपणास्त्रे प्रत्यक्ष लष्करी सेवेसाठी परिपूर्णतेने सज्ज असल्याची ग्वाही मिळाली.हे क्षेपणास्त्र बनविताना जे तंत्रज्ञान विकसित झाले त्याचा उपयोग आणखी वेगळ्या प्रकारची व जास्त क्षमतेची हवेतून हवेत व जमिनीवरून हवेत मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे तयार करण्यासाठी केला जाऊ शकेल.‘अस्त्र’ची काही वैशिष्ट्येबांधेसूद, निमुळता आकार३.५७ मीटर लांबीएकूण वजन १५४ किलोवेग आवाजाच्या चौपटउत्पादन खर्च प्रत्येकी ७ ते ८ कोटी रु.भारत डायनॅमिक्स या सरकारी कारखान्यात उत्पादनसध्या रशिया, फ्रान्स व इस्रायलकडून घेण्यात येणाºया क्षेपणास्त्रांहून स्वस्त

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागindian air forceभारतीय हवाई दल