शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

अस्थाना यांच्या मुलीच्या लग्नात अनेक सुविधा मिळाल्या विनाशुल्क

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 4:14 AM

सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांची सीबीआयकडून बडोद्यात चौकशी सुरु झाली आहे.

नवी दिल्ली / बडोदा : सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांची सीबीआयकडून बडोद्यात चौकशी सुरु झाली आहे. अस्थाना यांच्या मुलीच्या लग्न समारंभाबाबतची माहिती चार हॉटेल्सकडून घेतली आहे. तर, त्यांच्या जवळच्या १२ लोकांकडूनही माहिती घेण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अस्थाना कुटुंबीयांना या ठिकाणांचा लाभ नि: शुल्क मिळाला होता. केटरिंग आणि अन्य सेवांचे पेमेंट चेक आणि के्रडिट कार्डच्या माध्यमातून केले होते. या प्रकरणाची चौकशी अतिरिक्त संचालक ए. के. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. ज्या हॉटेल्सची चौकशी करण्यात आली त्यात लक्ष्मी विलास पॅलेस, हॉटेल एक्स्प्रेस टॉवर, सनसिटी क्लब आणि सूर्या पॅलेस हॉटेल यांचा समावेश आहे.सीबीआयच्या दस्तऐवजांनुसार, हॉटेल एक्स्प्रेस टॉवरकडून केटरिंगची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांनी कोणताही चार्ज घेतला नाही. हॉटेल एक्स्प्रेस टॉवर्सने लेखी दिले आहे की, आम्ही केवळ या कार्यक्रमासाठी भोजनाची व्यवस्था केली होती. अन्य सेवा दिल्या नव्हत्या. तसेच याचे कोणतेही शुल्क घेतले नव्हते. अस्थाना यांच्या नजिकच्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, चेकच्या माध्यमातून काही जणांचे पेमेंट करण्यात आले होते. सन २००८ ते २०११ या काळात अस्थाना हे बडोद्यात पोलीस आयुक्त होते. त्यामुळेच त्यांना या सेवा मोफत मिळू शकल्या, असे सांगण्यात येत आहे.दस्तऐवजावरून असे दिसते की, बडोद्याच्या सर्वात जुन्या पंचतारांकित स्टार हॉटेल ‘द ग्रँड मर्क्युअर सूर्या पॅलेस’कडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. देशातून आलेल्या १२०० लोकांच्या बिलापोटी अस्थाना यांच्या पत्नीने १० लाख रुपयांचे बिल दिले होते. सीबीआयने सर्व पावत्या पुरावे म्हणून ताब्यात घेतल्या आहेत. रोषणाई आणि म्युझिकची व्यवस्था करणारे सुनील नाईक यांनी सांगितले की, या समारंभासाठी आम्ही सेवा दिली होती. पण, मनीष ठक्कर यांच्याकडून आम्ही उप ठेकेदार होतो. अस्थाना यांनी आमचे पेमेंट चेकद्वारे केले.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग