तीन हजार कर्मचार्‍यांना कायम करण्याचे आश्वासन

By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:38+5:302015-02-11T00:33:38+5:30

आदिवासी विकासमंत्र्यांशी आंदोलकांची चर्चा

Assurance to sustain 3000 employees | तीन हजार कर्मचार्‍यांना कायम करण्याचे आश्वासन

तीन हजार कर्मचार्‍यांना कायम करण्याचे आश्वासन

िवासी विकासमंत्र्यांशी आंदोलकांची चर्चा
नाशिक : मंत्रिमंडळाच्या आर्थिक नियोजनाच्या बैठकीत आदिवासी विकास विभागांतर्गत कंत्राटी व तासिकेवर असलेल्या राज्यभरातील सुमारे ३२०० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना कायम करण्याचे आश्वासन आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी राज्य आदिवासी विकास विभाग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती संघटनेचे राज्य अध्यक्ष रितेश ठाकूर यांनी दिली.
येत्या २४ फेब्रुवारीपर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कायम न केल्यास संघटनेचे २५ फेब्रुवारीपासून बेमुदत आमरण उपोषण व त्यानंतर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा आदिवासी विकासमंत्र्यांना दिल्याचे रितेश ठाकूर यांनी सांगितले.
मागील डिसेंबर महिन्यात २३ ते ३१ दरम्यान आदिवासी विकास आयुक्तालयात महाराष्ट्र राज्य कंत्राटी व रोजगार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी ठिय्या आंदोेलन केले होते. त्यावेळी आदिवासी विकासमंत्र्यांनी हा प्रश्न आठवडाभरात निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. या संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आदिवासी विकास आयुक्तांना २ फेब्रुवारीपर्यंत प्रश्न न सुटल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला होता. काल या संघटनेच्या पाच पदाधिकार्‍यांची दुपारी दोन ते तीन दरम्यान आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याशी चर्चा केली. यावेळी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना सांगितले की, १३ व १४ फेब्रुवारी तसेच २३ व २४ फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, त्यात या कंत्राटी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना कायम करण्याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असून, त्यात या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सावरा यांनी सांगितले. यावेळी संघटनेच्या पदाधिकार्‍यात रितेश ठाकूर, बबिता पाडवी, एस. पी. गावित, संजय भाबड, कमलाकर पाटील, केशव ठाकरे, सुनीता तडवी, केशव ठाकरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे सुदर्शन उगले आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
फोटो कॅप्शन
१० पीएचएफबी-९७- आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांना निवेदन देताना आदिवासी विकास विभाग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी.

Web Title: Assurance to sustain 3000 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.