शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
3
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
4
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
5
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
6
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
7
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
8
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
9
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
10
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
11
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
12
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
13
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
14
Katrina Kaif-Vicky Kaushal Baby: गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
15
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
16
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
17
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
18
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
19
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
20
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात

बनावट संदेश रोखण्याचे व्हॉट्सअ‍ॅपचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 01:40 IST

सीओओंनी घेतली माहिती तंत्रज्ञान सचिवांची भेट

-संतोष ठाकूरनवी दिल्ली : जमावाकडून मारहाणीच्या (मॉब लिंचिंग) चिथावणीला कारण ठरत असलेले व वेगाने पसरणारे बनावट संदेश आणि त्यातील व्हॉटसअ‍ॅपच्या व्यापक भूमिकेवरून सरकारने कठोर पवित्रा घेतल्यानंतर व्हॉटसअ‍ॅपचे चीफ आॅपरेटिंग आॅफिसर मॅथ्यू इर्डिमा यांनी तातडीने उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले.मॅथ्यू इर्डिमा यांना माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयात सोमवारी पाचारण करण्यात आले होते. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इर्डिमा यांना स्पष्ट केले की, या प्रकरणी माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यापासून सरकारमध्ये असे मत बनले आहे की व्हॉटसअ‍ॅप्प तंत्रज्ञानाच्या साह्याने बनावट संदेश रोखण्यासाठी परिणामकारक पावले उचलणार नसेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्याच्याकडून लवकरच कारवाई झाली पाहिजे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या या कठोर भूमिकेनंतर व्हॉटसअ‍ॅपच्या सीओओंनी बनावट संदेश रोखण्यासाठी वेगाने पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माहिती व तंत्रज्ञान सचिव अजय साहनी यांना आपल्या प्रतिनिधी मंडळासह भेटायला आलेले इर्डिमा यांनी बनावट संदेश रोखण्यासाठी लवकरच परिणामकारक पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले. सहानी यांनी रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केलेली चिंताही त्यांना कळवली व तुमच्याकडून सर्व ती पावले उचलावीत, असे सांगितले. फॉरवर्ड लिहून येणाºया संदेशांसोबत फॉरवर्ड संदेश फक्त पाच ग्रुपमध्येच पाठवण्याचा उल्लेख करून इर्डिमा म्हणाले की, हे पाऊल माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मिळालेल्या नोटिशीनंतर उचलले गेले आहे. यावरून आम्ही भारत सरकारसोबत काम करू इच्छितो हेच यातून दिसते. आम्ही इतरही पावले उचलत आहोत. नुकतेच रविशंकर प्रसाद म्हणाले होते की, व्हॉटसअ‍ॅपने हे बघावे की शेवटी एकावेळी विशिष्ट भागात विशेष संदेश मोठ्या संख्येने कसा प्रसारित होत आहे. अशा संदेशांना संशयास्पद मानून ते शोधून काढून स्थानिक पोलीस यंत्रणेसोबत काम करावे. त्यातून असे संदेश वाचून संभाव्य दुर्घटना थांबवता येईल.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅप