बार्शीतील बेकायदेशीर मद्य विक्री बंद करण्याची मागणी परमिट रूम बंद करण्याचा असोसिएशनचा निर्णय

By Admin | Updated: March 25, 2015 21:10 IST2015-03-25T21:10:01+5:302015-03-25T21:10:01+5:30

बार्शी :

The Association's decision to close the permit room demanding the closure of illegal liquor sales in Barshi | बार्शीतील बेकायदेशीर मद्य विक्री बंद करण्याची मागणी परमिट रूम बंद करण्याचा असोसिएशनचा निर्णय

बार्शीतील बेकायदेशीर मद्य विक्री बंद करण्याची मागणी परमिट रूम बंद करण्याचा असोसिएशनचा निर्णय

र्शी :
बार्शी शहर व परिसरात विविध ठिकाणी होणारी बेकायदेशीर मद्याची विक्री तातडीने बंद करण्याची मागणी अनेक वेळा करून सुद्धा प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्यामुळे शहरातील सर्व परवानाधारकांनी परवान्याचे नूतनीकरण न करता 1 एप्रिलपासून हॉटेल, परमिट रूम बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बार्शी शहर बार व परमिट रूम असोसिएशनचे अध्यक्ष विजय चोप्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली़
सध्या बार्शी शहराच्या परिसरात सुमारे शंभराहून अधिक ठिकाणी बेकायदेशीर मद्य विक्री होत असल्याने याचा परिणाम लायसन्सधारकांवर होत आहे. यासाठी परवानाधारक वर्षाला दोन लाखांचे शुल्क भरतात. पण अनधिकृत विक्री करणार्‍यांमुळे लायसन्सधारकांच्या व्यवसायावर परिणाम होऊ लागल्याने संघटनेच्या वतीने डिसेंबर 2013, मार्च 2014 व 20 जानेवारी 2015 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांना भेटून व्यथा मांडल्या होत्या. त्यावर त्यांनी संबंधित शासकीय अधिकार्‍यास बेकायदेशीर मद्याची विक्री करणार्‍यांवर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. पण ठोस कारवाई न करता दिलेल्या सूचनेला न जुमानता खोट्या व बोगस केसेस केल्याचे यावेळी अध्यक्षांनी सांगितल़े यामुळे सध्या बेकायदेशीर विक्री खुलेआम चालू असल्याने परवानाधारकांवर अन्याय होऊ लागला आहे.
1 एप्रिलपासून शासनाने लायसन्स फीमध्ये वाढ केल्याने परमिटधारक आर्थिक अडचणीत सापडले आहेत़ लायसन्स नूतनीकरण करणेही अवघड झाले आहे. त्यामुळे बेकायदेशीर मद्य विक्री जोपर्यंत बंद केली जात नाही तोपर्यंत लायसन्स नूतनीकरण न करता 1 एप्रिलपासून परमिट रूम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सर्वांनी जाहीर केले आहे. यावेळी उपाध्यक्ष विनोद चोप्रा, सचिव अमर शे?ी, खजिनदार राजाभाऊ बालावाडे, सदस्य बाळासाहेब बारबोले, लारा चव्हाण, अनिल माने, कृष्णा सोरेगावकर, प्रशांत सांगळे, धनंजय सोरेगावकर आदी उपस्थित होते.

Web Title: The Association's decision to close the permit room demanding the closure of illegal liquor sales in Barshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.