शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

'भाजपचा मोठा विजय, अशात I.N.D.I.A साठी...', ओवेसी यांनी निवडणूक निकालानंतर केली मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 19:36 IST

या विधानसभा निकालानंतर, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व आणि अविस्मरणीय यश मिळाले आहे. या विधानसभा निकालानंतर, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. हिंदी भाषी राज्य मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान येथील निवडणूक निकालांमुळे काँग्रेससमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

खासदार ओवेसी म्हणाले, "भाजपचा मोठा विजय आहे. यामुळे, विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या 'इंडिया' अलायन्ससाठी आता 2024 लोकसभेसाठी आव्हान आहे. तीन राज्यांचे आलेले निकाल 2024 मध्ये काँग्रेस पक्षासाठीही धोक्याची घंटा असू शकते. आम्ही छत्तीसगडमध्ये लढलो नाही आणि येथेही भाजपला विजय मिळाला."

येथे उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे, तेलंगाना विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएमला सात जागांवर विजय मिळाला आहे. यात ओवेसी यांचा छोटा भाऊ अकबरुद्दीन ओवेसींनीही चंद्रायनगुट्टा मतदार संघातून विजय मिळवला आहे.

कुठे कशी आहे भाजप आणि काँग्रेसची स्थिती? -- मध्य प्रदेशात भाजपने प्रचंड बहुमतासह विजय मिळवला आहे. येथे एकूण 230 जागांपैकी तब्बल 163 जागांवर भाजपचे कमळ फुलले आहे. तर काँग्रेसला केवळ 66 जागांवरच विजय मिळवता आला आहे.

- राजस्थानात 199 जागांपैकी तब्बल 115 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. काँग्रेसला 69 जागाच मिळाल्या आहेत. तर इतरांना 15 जागा मिळाल्या आहेत.

- छत्तीसगडमधील जनतेने यावेळी काँग्रेसला नाकारत भाजपला सिंहासनावर बसवले आहे. येथे 90 जागांपैकी भाजपला 54 तर काँग्रेसला 35 जागा मिळाल्या आहेत. 

- तेलंगणातील जनतेने बीआरएसला नाकारत काँग्रेसच्या हाती राज्याची धुरा दिली आहे. येथे 119 जागांपैकी 64 जागांवर काँग्रेसला विजय मिळाला आहे. तर बीआरएस 39 जागा मिळाल्या आहेत. या खेरीज भाजपला 8, एआयएमआयएमला 7 तर इतरांना 1 जागा मिळाल्या आहेत. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकcongressकाँग्रेस