विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज होणार जाहीर
By Admin | Updated: September 12, 2014 13:00 IST2014-09-12T12:11:36+5:302014-09-12T13:00:14+5:30
महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीर या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज होणार जाहीर
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीर या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने आज संध्याकाळी ४.३० वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आजपासूनच आचारसंहिताही लागू होणार आहे.
हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ऑक्टोबरमध्ये तर महाराष्ट्र विधानसभेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत आहे. या दोन्ही राज्यांमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. महाराष्ट्रात अद्याप आघाडी व महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. मात्र निवडणूक नेमकी कधी होणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. आज संध्याकाळी ही प्रतिक्षा संपुष्टात येणार आहे.