लखनौ - राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत सत्ता मिळवण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर मिळवलेल्या या निर्णायक विजयामुळे काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, देशभरातील काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे. दरम्यान, लखनौ येथे काँग्रेसच्या कार्यालयात चक्क मोदीच शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केवळ शुभेच्छाच दिल्या नाहीत, तर त्यांच्यासोबत मनसोक्त नाचही केला. मात्र हे खरे मोदी नव्हते तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसाऱखे दिणारे अभिनंदन पाठक होते. काँग्रेसच्या बाजूने विधानसभा निवडणुकीचे कल येऊ लागताच अभिनंदन पाठक यांनी काँग्रेसच्या लखनौ येथील कार्यालयाकडे धाव घेतली. काँग्रेसच्या कामगिरीमुळे आनंदीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत जोरदार नाचही केला.
Assembly Election 2018 Results : अन् मोदींनीही केला काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 16:27 IST