शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

भाजप आणि काँग्रेसलाही विजयाची समान संधी, एक्झिट पोलमधून खुशी व गम दोन्ही? सर्वच ठिकाणी काट्याची लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 06:55 IST

Exit Polls: पाच राज्यांचे एक्झिट पोल सत्ताधारी भाजपसाठी आनंद आणि चिंता दोन्ही घेऊन आले आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपला मोठा विजय मिळेल, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आल्याने भाजप नेतृत्व आनंदी आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली - पाच राज्यांचे एक्झिट पोल सत्ताधारी भाजपसाठी आनंद आणि चिंता दोन्ही घेऊन आले आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपला मोठा विजय मिळेल, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आल्याने भाजप नेतृत्व आनंदी आहे. 

१० एक्झिट पोलपैकी ७ ने राजस्थानमध्ये भाजप जिंकण्याचा अंदाज वर्तविला आहे. ॲक्सिस-इंडिया टुडेने राजस्थानमध्ये काँग्रेस बाजी मारणार असल्याचा आणि भाजपची बस चुकण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात चुकीच्या रणनीतीची पक्षाला किंमत चुकवावी लागू शकते, असेही यात म्हटले आहे. इंडिया टीव्ही-सीएनएक्सनेही राज्यात काँग्रेस आघाडीला ९४ ते १०४ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. चाणक्य-न्यूज २४ ने दोन्हीपैकी कोणताही पक्ष जिंकू शकेल, असे म्हटले आहे. इतर सर्व्हेंनी भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. 

या फॅक्टरचा काँग्रेसला फटकाज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या २२ समर्थक आमदारांच्या पक्षांतरामुळे सत्ता गमावलेल्या मध्य प्रदेशात काँग्रेसला सर्वांत मोठा धक्का बसू शकतो. शिंदे भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेस सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत होती; परंतु मतदारांनी हा प्रयत्न अयशस्वी ठरवला आहे. भाजपचा जोरदार विजय झाल्यास काँग्रेसला राज्याच्या नेतृत्वात बदल करण्यास भाग पडू शकते. 

तेलंगणात काँग्रेसची लाट? काँग्रेस छत्तीसगडमध्ये सत्ता टिकवून ठेवणार आहे आणि तेलंगणामधील दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसकडून सत्ता हिसकावून घेणार आहे, असा अंदाज जवळपास सर्वच सर्व्हेंनी व्यक्त केला आहे. पक्षाची राज्यात लाट आहे आणि पक्षाला ११९ पैकी ७० जागा मिळू शकतात, असेही अनेकांनी म्हटले आहे; परंतु ॲक्सिस-इंडिया टुडेने एक दिवसासाठी अंदाज थांबवला आहे, कारण काही मतदारसंघांमध्ये रात्री ९ पर्यंतमतदान सुरू होते. 

 

टॅग्स :exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३chhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३