शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

Assembly Election : अमित शहांचा प. बंगालमध्ये रोड शो, रिक्षावाल्याच्या घरी केलं दुपारचं जेवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 17:29 IST

Assembly Election : पश्चिम बंगालमध्ये 200 पेक्षा जास्त जागांवर भारतीय जनता पक्षाला विजय मिळणार असून राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास यावेळी शहा यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्देदोमजूर येथील रोड शोपूर्वी अमित शहा यांनी एका रिक्षाचालक कार्यकर्त्याच्या घरी जेवण केले. यावेळी, राजीव बॅनर्जींसह अनेक पदाधिकारीही दुपारच्या जेवणाला उपस्थित होते. 

कोलकाता - भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते प्रचारसभा घेत आहेत. या दरम्यान, आज अमित शहांनी एका रिक्षावाल्या कार्यकर्त्याच्याघरी जेवण केलं. येथील दोमजूर मतदारसंघातील भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ अमित शहांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. 

पश्चिम बंगालमध्ये 200 पेक्षा जास्त जागांवर भारतीय जनता पक्षाला विजय मिळणार असून राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास यावेळी शहा यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. ममता बॅनर्जी यांची निराशा, त्यांच्या वागण्यात, भाषणात आणि व्यवहरातही दिसून येत आहे. त्यामुळेच, भाजपाच विजय निश्चित आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते राजीव बॅनर्जी यांचा प्रचार करण्यासाठी मी आलो आहे, मला पूर्णपणे विश्वास आहे, की राजीव निवडूण येतील. 2 मे रोजी जेव्हा निकालाचे आकडे समोर येतील, तेव्हा 200 पेक्षा जास्त जागांवर भाजप विजयी ठरेल, असेही त्यांनी म्हटले.  दोमजूर येथील रोड शोपूर्वी अमित शहा यांनी एका रिक्षाचालक कार्यकर्त्याच्या घरी जेवण केले. यावेळी, राजीव बॅनर्जींसह अनेक पदाधिकारीही दुपारच्या जेवणाला उपस्थित होते. 

अमित शहांच्या जीवाला धोका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) आणि उत्तर प्रदेशचे मुख्य़मंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांच्या जिवाला धोका आहे. मुंबईतील केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या (CRPF) मुख्यायाला एक मेल मिळाला आहे. यामध्ये येणाऱ्या काही दिवसांत गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हत्या करण्यात येणार आहे, असे म्हटले आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाauto rickshawऑटो रिक्षा