नवी दिल्ली: एकीकडे इराण युद्धामुळे देशभरात खळबळ उडालेली असताना देशातील राजकीय वातावरणही तापणार आहे. भारतीय निवडणूक आयोग आज पाच महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी यांचा समावेश आहे. आज संध्याकाळपर्यंत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होऊन तारखांची अधिकृत घोषणा होऊ शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग यावेळी मतदानाचे टप्पे कमी करण्यावर विचार करत आहे. २०२१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यात मतदान झाले होते, मात्र यावेळी हे टप्पे कमी करण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलांची मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात येणार आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार रोखण्यासाठी आणि निष्पक्ष मतदानासाठी सुरक्षा कडक केली जाणार आहे.
आचारसंहिता लागू होणारनिवडणूक आयोगाने तारखा जाहीर करताच संबंधित राज्यांमध्ये 'आदर्श निवडणूक आचारसंहिता' तात्काळ लागू होईल. या राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ मे आणि जून २०२६ मध्ये संपत आहे, त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याचे आयोगाचे उद्दिष्ट आहे.
निवडणुकीची तयारी पूर्णसर्व ५ राज्यांमध्ये अंतिम मतदार यादी तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. निवडणूक आयोगाच्या पथकांनी यापूर्वीच सर्व राज्यांचा दौरा करून सुरक्षा आणि इतर तयारीचा आढावा घेतला आहे. आता संपूर्ण देशाचे लक्ष आयोगाच्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे.
Web Summary : Election Commission may announce election dates for West Bengal, Assam, Tamil Nadu, Kerala, and Puducherry today. The model code of conduct will immediately be enforced. Focus on minimizing voting phases and heightened security.
Web Summary : चुनाव आयोग आज पश्चिम बंगाल, असम, तमिलनाडु, केरल और पुडुचेरी के चुनावों की तारीखों की घोषणा कर सकता है। आचार संहिता तुरंत लागू होगी। मतदान चरणों को कम करने और सुरक्षा बढ़ाने पर ध्यान केंद्रित किया गया है।