UP Assembly Election 2022: भाजपानंतर आता समाजवादी पार्टीलाही 'जोर का झटका'! आमदाराचा राजीनामा, काय म्हणाले वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 08:28 PM2022-01-14T20:28:23+5:302022-01-14T20:31:37+5:30

UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या तोंडावरच भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपातील अनेक दिग्गज पक्षाला रामराम करुन समाजवादी पक्षात प्रवेश करत आहेत.

UP Assembly Election 2022 sp mla ghanshyam lodhi resign dalit bjp | UP Assembly Election 2022: भाजपानंतर आता समाजवादी पार्टीलाही 'जोर का झटका'! आमदाराचा राजीनामा, काय म्हणाले वाचा...

UP Assembly Election 2022: भाजपानंतर आता समाजवादी पार्टीलाही 'जोर का झटका'! आमदाराचा राजीनामा, काय म्हणाले वाचा...

Next

UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या तोंडावरच भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपातील अनेक दिग्गज पक्षाला रामराम करुन समाजवादी पक्षात प्रवेश करत आहेत. ओबीसी समाजाच्या काही आमदारांनी राजीनामे दिले आहेत. भाजपामध्ये बंडखोरीचं वादळ आल्यानंतर आता समाजवादी पक्षातही राजीनामा सत्र सुरू झालं आहे. समाजवादी पक्षाचे आमदार घनश्याम लोधी यांनी राजीनामा दिला आहे. 

राजीनामा देताना घनश्याम यांनी एक पत्र देखील लिहिलं आहे. समाजवादी पक्षाकडून दलित समाजाकडे दुर्लक्ष केलं गेल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. याच कारणामुळे राजीनामा देत असल्याचं घनश्याम यांनी म्हटलं आहे. दलित समाजाला पक्षात स्थान नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. घनश्याम लोधी राजीनाम्यानंतर आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

घनश्याम लोधी यांनी जे कारण देत राजीनामा दिला आहे. तेच कारण स्वामी प्रसाद मौर्य आणि भाजपाचा इतर आमदारांनी राजीनामा देताना दिलं होतं. या निवडणुकीत भाजपाचा सुपडासाफ होणार असल्याचा दावा स्वामी प्रसाद मौर्य यांनी आज केला आहे. यावेळी भाजपाला ओबीसी समाजाचं समर्थन मिळणार नाही असंही मौर्य म्हणाले. 'सपा'कडून सत्तांतराचा दावा केला जात असताना आता पक्षाला देखील मोठा धक्का बसला आहे. 

धनश्याम लोधी यांची त्यांच्या समाजात चांगली पकड आहे. मुसद्दी नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ऐन निवडणकीच्या तोंडावर त्यांनी समाजवादी पक्षाला रामराम करणं ही एक मोठी घटना मानली जात आहे. आता ते नेमकं कोणत्या पक्षात सामील होणार की इतर कोणता राजकीय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. 

Web Title: UP Assembly Election 2022 sp mla ghanshyam lodhi resign dalit bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.