शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : आणखी दोन आठवडे लॉकडाऊन वाढवा, 'या' राज्याची केंद्राकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 17:13 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देआसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनीही लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले की, राज्याने केंद्राला पत्र लिहिले असून यामध्ये लॉकडाऊन 18 मेपासून आणखी दोन आठवड्यांसाठी वाढविण्याची विनंती केली आहे.

गुवाहाटी - देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने १७ मेपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली आहे. यातच आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनीही लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले की, राज्याने केंद्राला पत्र लिहिले असून यामध्ये लॉकडाऊन 18 मेपासून आणखी दोन आठवड्यांसाठी वाढविण्याची विनंती केली आहे.

मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची शुक्रवारी गुवाहाटी येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी केंद्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यासंदर्भात शुक्रवारपर्यंत सर्व राज्यांना आपल्या सूचना देण्यास सांगितले होते. त्यानुसार आसाम सरकारने आपली भूमिका केंद्राला कळविली आहे, असे सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले. 

केंद्र सरकारला पाठविण्यात आलेल्या सूचनांमध्ये लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्यासाठी आवश्यक असलेल्या सवलतींबाबतही मत मांडले आहे, असे सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले. केंद्र सरकारला यावर विचार करण्यास वेळ दिला पाहिजे. मला आत्ता याबद्दल जास्त काही बोलायचे नाही. सर्व राज्यांनी केंद्राला पत्र लिहिले असून ते लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याबाबत निर्णय घेतील, असेही सर्वानंद सोनोवाल यांनीही म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार दिवसांपूर्वी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा 17 तारखेला संपणार आहे.  लॉकडाऊन वाढविण्याबाबत सर्व राज्यांनी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सर्व राज्यांना 15 तारखेपर्यंत आराखडा सादर करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत.

टॅग्स :AssamआसामSarbananda Sonowalसर्वानंद सोनोवालcorona virusकोरोना वायरस बातम्या