शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

Omicron Variant : भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेली 'ही' किट दोन तासांत ओळखणार 'ओमायक्रॉन' व्हेरिएंट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 17:49 IST

Omicron Variant : वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विश्वज्योती बोरकाकोटी ( Dr Biswajyoti Borkakoty) यांच्या नेतृत्वाखाली  इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि रिजनल मेडिकल रिसर्च सेंटरच्या शास्त्रज्ञांनी ही किट बनवली आहे.

दिब्रुगढ (आसाम) : कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा ( Omicron) संसर्ग भारतातही आढळून आला आहेत. या नवीन व्हेरिएंटने भारतासह जगाची चिंता वाढवली आहे. आतापर्यंत, हा नवीन व्हेरिएंट शोधण्यासाठी, लोकांचे सॅम्पल घेऊन जीनोम सिक्वेसिंगसाठी पाठवले जात होते, त्याचा रिपोर्ट येण्यास बराच वेळ लागत होता. मात्र, आसाममधील दिब्रुगडमध्ये इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि रिजनल मेडिकल रिसर्च सेंटरने (RMRC) एक किट विकसित केली आहे, जी केवळ दोन तासांत नवीन कोरोना व्हेरिएंट ओमायक्रॉनचा शोध लावू शकते.

ज्या प्रवाशांना नवीन व्हेरिएंटच्या टेस्टिंगबाबत विमानतळावर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यांच्यासाठी ही बातमी मोठा दिलासा देणारी ठरू शकते. दिब्रुगढमधील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चची टीम 24 नोव्हेंबरपासून या किटवर काम करत होती. त्यांनी कोरोना रूग्णांच्या 1,000 हून अधिक सॅम्पलचे टेस्ट केले आहे, ज्यात इतर काही राज्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये ओमायक्रॉनचा नवीन व्हेरिएंट आढळून आला होता.

सध्या या टेस्टिंग किटची परवाना प्रक्रिया सुरू आहे. पुढील आठवड्यापासून हे किट लॅबसाठी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विश्वज्योती बोरकाकोटी ( Dr Biswajyoti Borkakoty) यांच्या नेतृत्वाखाली  इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि रिजनल मेडिकल रिसर्च सेंटरच्या शास्त्रज्ञांनी ही किट बनवली आहे.

डॉ. विश्वज्योती बोरकाकोटी यांनी सांगितले की,  ICMR-RMRC टीमने कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन (B.1.1.529) SARS-CoV-2 (COVID-19) शोधण्यासाठी हायड्रोलिसिस टेस्ट-आधारित रिअल-टाइम RT-PCR ला डिझाइन केले आहे. याच्या मदतीने ओमायक्रॉन व्हेरिएंटच्याबाबत माहिती दोन तासांत कळेल. तसेच, जीसीसी बायोटेक ही कोलकाता स्थित कंपनी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलवर किट तयार करत आहे. दरम्यान, टेस्टिंग किटचा वापर त्या प्रयोगशाळांमध्ये केला पाहिजे, जिथे  RT-PCR सुविधा आहे.  

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या