शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

मुले पळविणारे समजून दोघांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 03:47 IST

आसामच्या करबी अंगलाँग जिल्ह्यात मुले पळविण्यासाठी आल्याच्या गैरसमजातून शुक्रवारी रात्री स्थानिक गावकऱ्यांनी दोन पर्यटकांना बेदम मारहाण करून ठार मारले.

गुवाहाटी - आसामच्या करबी अंगलाँग जिल्ह्यात मुले पळविण्यासाठी आल्याच्या गैरसमजातून शुक्रवारी रात्री स्थानिक गावकऱ्यांनी दोन पर्यटकांना बेदम मारहाण करून ठार मारले.जिल्हा पोलीस अधीक्षक व्ही. शिवप्रसाद गंजाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या दोघांची नावे निलोत्पल दास व अभिजित नाथ अशी आहेत. दास अभियंता तर नाथ व्यापारी होते. दोघेही आसाममधीलच असून ते कांगथीलांगसो धबधब्याकडे चालले होते. पंजारी कचरी गावात स्थानिक नागरिकांनी त्यांच्या मोटारीस गराडा घातला व बाहेर खेचून त्यांना बेदम मारहाण केली.निलोत्पल दास गयावया करीत असूनही त्यांना अमानुष मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांत व्हायरल झाला. गेले काही दिवस या भागांमध्ये मुले पळविणारी टोळी आली असल्याच्या अफवा समाजमाध्यमांतून पसरविल्या जात होत्या. त्यातूनच गैरसमज होऊन या दोघांना ठार केले गेले असावे, असे पोलिसांना वाटते.या घटनेनंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) मुकेश अगरवाल तातडीने करबी अंगलॉँग जिल्ह्यात रवाना झाले. समाजमाध्यमांत अशा अफवा पसरल्यापासून गेल्या काही दिवसांत सोनितपूर, पश्चिम करबी अंगलाँग व नागाव जिल्ह्यात अशाच प्रकारच्या इतरही घटना घडल्या असल्याचे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)पूर्वीही घडलेअसे प्रकारदोन वर्षांपूर्वी ब्रह्मपुत्रेच्या खालच्या खोºयात असलेल्या चिरांग, दारांग व सोनितपूर जिल्ह्यांत अशाच अफवांवरून झालेल्या हल्ल्यांमध्ये चौघांना ठार करण्यात आले होते.

टॅग्स :AssamआसामCrimeगुन्हा