शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

पत्नीचं कर्करोगामुळं निधन, काही मिनिटातच IPS अधिकाऱ्यानं ICU मध्येच स्वत:ला संपवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 11:30 IST

Assam Home Secretary Shiladitya Chetia shoots himself : शिलादित्य चेतिया यांच्या पत्नी अगामोनी बोरबरुआ या ४० वर्षांच्या होत्या. नेमकेअर हॉस्पिटलमध्ये दुपारी ४.२५ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

गुवाहाटी : आसामचे गृहसचिव शिलादित्य चेतिया यांनी मंगळवारी आपल्या पत्नीच्या निधनानंतर स्वत:चा जीव संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिलादित्य चेतिया यांनी मंगळवारी गुवाहाटी येथील खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये पत्नीच्या मृतदेहासमोर सर्व्हिस रिव्हॉल्व्हर स्वत:वर गोळी झाडली. पत्नीच्या मृत्यूनंतर काही मिनिटांतच त्यांनी आत्महत्या केली. त्यांची पत्नी गेल्या अनेक महिन्यांपासून कर्करोगाने आजारी होती. दोन महिन्यांपूर्वी तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००९ बॅचचे आयपीएस अधिकारी शिलादित्य चेतिया यांनी आयसीयूमध्ये आपल्या सरकारी रिव्हॉल्व्हरने पत्नीच्या मृतदेहासमोर स्वत:वर गोळी झाडली. येथेच काही मिनिटांपूर्वी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. राज्याचे गृहसचिव म्हणून पोस्टिंग होण्यापूर्वी, शिलादित्य चेतिया यांनी तिनसुकिया आणि सोनितपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) आणि आसामपोलिसांच्या चौथ्या बटालियनचे कमांडंट म्हणून काम केले होते. त्यांनी  राष्ट्रपती शौर्य पदक मिळाले होते. त्यांचे वय ४४ वर्षे होते. शिलादित्य चेतिया यांच्या पत्नी अगामोनी बोरबरुआ या ४० वर्षांच्या होत्या. नेमकेअर हॉस्पिटलमध्ये दुपारी ४.२५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. १० मिनिटांनंतर  शिलादित्य चेतिया यांनीही या जगाचा निरोप घेतला. पत्नीच्या मृत्यूनंतर ते पहिल्यांदा आयसीयू केबिनमध्ये गेले आणि पत्नीच्या मृतदेहाजवळ प्रार्थना करायची आहे. यासाठी मला काही काळ एकटे सोडा, अशी विनंती वैद्यकीय कर्मचाऱ्यांना केली. त्यानंतर वैद्यकीय कर्मचारी आयसीयूमधून बाहेर पडले. यानंतर त्यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने आत्महत्या केली. गोळीबाराच्या आवाजाने रुग्णालयात एकच खळबळ उडाली.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नेमकेअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक हितेश बरुआ यांनी सांगितले की, "आम्ही गोळीचा आवाज ऐकला आणि आयसीयूमध्ये गेलो. तेव्हा शिलादित्य चेतिया हे पत्नीच्या मृतदेहाजवळ पडलेले होते. आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही. त्यांनी स्वतःवर गोळी झाडली होती. तसेच, त्यांच्या पत्नी अगमोनी यांच्यावर जवळपास दोन महिने रुग्णालयात उपचार सुरू होते. तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. आम्ही शिलादित्य चेतिया यांना त्यांच्या तब्येतीबद्दल सांगितले आणि त्यांना आमचे म्हणणे समजले होते."

टॅग्स :AssamआसामPoliceपोलिस