शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Assam:सेंट्रल आणि स्पेशल जेलमधील 85 कैद्यांना HIV ची लागण, 'हे' आहे संसर्गाचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 16:28 IST

85 पैकी 45 विशेष कारागृह आणि 40 नागाव केंद्रीय कारगृहातील कैदी आहेत.

गुवाहाटी: असाम राज्यातील नागाव मध्यवर्ती(Nagaon Central Jail) आणि विशेष कारागृहात(Special Jail) सप्टेंबर महिन्यात 85 कैद्यांना एचआयव्हीची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने ही धक्कादायक माहिती दिली. ही माहिती समोर येताच प्रशासनात खळबळ माजली आहे.

नागाव सिव्हिल हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. एल.सी. नाथ यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, एचआयव्ही बाधित 85 कैद्यांपैकी 45 विशेष कारागृहातील आणि 40 नागाव मध्यवर्ती कारागृहातील आहेत. या सर्वांना अमली पदार्थांच्या व्यसनामुळे एचआयव्हीची लागण झाल्याची माहिती आहे. गेल्या महिन्यात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चार महिलांसह 88 लोकांच्या तपासणीत संसर्गाची पुष्टी झाली होती.

काय आहे संसर्गाचे कारण ?नागाव जिल्हा आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एचआयव्ही बाधित कैद्यांमधील अनेकांना ड्रगचे व्यसन आहे. हे सर्व कैदी एकाच सुईचा वापर प्रतिबंधित औषधे घेण्यासाठी करत असतात, ज्यामुळे एकाचा आजार दुसऱ्यांपर्यंत जातो. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव अनुराग गोयल यांनी सांगितले होते की, आसाम स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी (ASACS) ने जारी केलेल्या आकडेवारीत, आसाममध्ये 2002 ते 2021 पर्यंत एकूण 20,085 HIV पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आकडेवारीनुसार, कामरुपमध्ये सर्वाधिक 6,888 एचआयव्ही रुग्ण आहेत, तर कचरमध्ये 4609 आणि डिब्रूगढमध्ये 1245 एचआयव्ही बाधित रुग्ण आहेत.

टॅग्स :AssamआसामHIV-AIDSएड्सPrisonतुरुंगjailतुरुंग