शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

Assam Floods : ...अन् आश्रय घेण्यासाठी चक्क बेडरुममध्ये शिरले वाघोबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 17:11 IST

आसाममधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. पुरातून वाचण्यासाठी एका वाघाने चक्क घरामध्ये आसरा घेतल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देआसाममधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. पुरातून वाचण्यासाठी एका वाघाने चक्क घरामध्ये आसरा घेतल्याची माहिती समोर आली आहे. वाघाचा हाच फोटो वाईल्ड लाईफ ट्रस्ट इंडियाने आपल्या ट्विटर हँडलवरुन पोस्ट केला आहे.

नवी दिल्ली - आसाममध्ये महापुरामुळे 430 चौ. किमी. क्षेत्रफळाच्या काझीरंगा अभयारण्यातील 90 टक्के भागात पाणी शिरले आहे. गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्यातील सर्व प्राणी या जलप्रलयापासून जीव वाचवण्याकरिता उंच जागी जाण्याची धडपड करीत आहेत. मात्र, या प्रयत्नात शनिवारपासून आतापर्यंत 23 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. 

आसाममधीलपूरस्थिती गंभीर झाली आहे. पुरातून वाचण्यासाठी एका वाघाने चक्क घरामध्ये आसरा घेतल्याची माहिती समोर आली आहे. बेडरूममध्ये वाघ दिसल्यानंतर भयभीत झालेल्या लोकांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी एका कर्मचाऱ्याने या वाघाची छबी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केली. वाघाचा हाच फोटो वाईल्ड लाईफ ट्रस्ट इंडियाने आपल्या ट्विटर हँडलवरुन पोस्ट केला आहे. वाघाचा हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. 

 मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 29 जिल्ह्यांतील 57, 51,938 लोकांना पुराचा फटका बसला आहे. आसाम सरकारचे जलस्रोत खात्याचे मंत्री केशब महंत यांनी सांगितले की, काझीरंगा अभयारण्यामध्ये असलेल्या उंच ठिकाणांमुळे तेथील प्राण्यांचा जीव बचावण्यास मदत झाली आहे. तेथील परिस्थितीवर सरकारी यंत्रणा लक्ष ठेवून आहे व लागेल ती मदत तात्काळ पुरविण्यात येत आहे. काझीरंगा अभयारण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, महापुरामुळे या अभयारण्यात मोठ्या संख्येने गेंडे व रानम्हशी अजूनही अडकलेल्या आहेत.

चिरंग, बारपेट आणि बक्सा या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याने जमीन वाहून गेली आहे. 4,626 गावे पाण्याखाली गेली आहेत. आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी आसाममधील पूरस्थिती राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा अशी मागणी आसामच्या खासदारांनी केली होती. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 29 जिल्ह्यांना पुराने घेरले आहे. पूरग्रस्त जिल्ह्यांत धेमजी, लखीमपूर, बिस्वनाथ, सोनीतपूर, दारंग, बक्सा, बारपेट, नालबारी, चिरंग, बोंगाईगाव, कोक्राझार, गोलपाडा, मोरीगाव, होजई, गोलाघाट, मजुली, जोरहाट, शिवसागर, दिब्रुगढ आणि तीनसुकिया यांचा समावेश आहे. 

आसाममधील सध्याच्या पूरस्थितीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याकडून दूरध्वनीवरून घेऊन ही परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यात पूर आणि दरडी कोसळून काही लोकांचा मृत्यू झाला आहे. बक्सा जिल्ह्यात लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या पथकाने आतापर्यंत 850 नागरिकांची पुरातून सुखरूप सुटका केली आहे. नदी काठावर बांधण्यात आलेले कूस, रस्ते, पूल आणि इतर बांधकामे वाहून गेली आहेत. प्रशासनाने 11 जिल्ह्यांत 68 मदत छावण्या उभारल्या आहेत. त्यामध्ये हजारो लोकांनी आश्रय घेतला आहे. 

आसाम पूरग्रस्त परिस्थिती; रोहित शर्माचं भावनिक आवाहन, म्हणाला...

आसाममध्ये निर्माण झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीवर भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मान नागरिकांना आवाहन केले आहे. आसाममध्ये आलेल्या पूरग्रस्त परस्थितीवर त्याने चिंता व्यक्त केली. या पुरामुळे तेथील वन्यजीवांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यांनी हक्काचे घर गमावले आहे. त्यामुळे नव्या निवाऱ्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळे अनेक प्राणी रस्त्यावर आलेले दिसत आहेत. त्यामुळे रोहितने तेथील लोकांना वाहनं सावकाश चालवण्याचं आवाहन केलं आहे.

काझीरंगा व आसामधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावला अक्षय कुमार, 2 कोटींची केली मदत

मदतीसाठी चर्चेत असणारा बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. त्याने आसाम मुख्यमंत्री सहायता निधी आणि काझीरंगा नॅशनल पार्कसाठी 1-1 कोटी रुपये दिले आहेत. याबाबतची माहिती त्याने ट्विटरवर दिली आहे. अक्षय कुमारने ट्विट केलं की, आसाममध्ये पुरामुळे प्रभावित झालेल्या लोकांची अवस्था पाहून मन हेलावून जात आहे. मनुष्य असो किंवा प्राणी, कठीण समयी सर्वांना मदत व सहकार्याची गरज असते. मी सीएम रिलीफ फंड आणि काझीरंगा पार्कच्या बचावासाठी 1-1 कोटी रुपये दान करत आहे. त्याशिवाय लोकांना आवाहन करेन की त्यांनी महापुरामुळे प्रभावित झालेल्या लोक व प्राण्यांच्या मदतीसाठी पुढे यावे.

आसाम महापुराच्या संकटात, 'सुवर्णकन्या' हिमा दासची मदतीसाठी साद! आसाममध्ये निर्माण झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीत तेथील नागरिकांना मदत करावी असे आवाहन सुवर्णकन्या हिमा दासनं केलं आहे. तिनं तिच्या पगाराची निम्मी रक्कम पूरग्रस्तांसाठी दिली आहे. हिमा दास इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये HR अधिकारी म्हणून काम करते. शिवाय तिनं अनेक कॉर्पोरेट्स कंपन्यांना मदतीसाठी आवाहन केले आहे. ''आसाममधील पूरपरिस्थिती गंभीर आहे. 33पैकी 30 जिल्हे पूराच्या पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे मी सर्व कॉर्पोरेट्स आणि सर्वांना विनंती करते की या कठीण समयी आसामला मदत करा,'' अशी फेसबुक पोस्ट हिमाने लिहिली आहे. 

 

टॅग्स :AssamआसामfloodपूरDeathमृत्यूTigerवाघ