शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Assam Flood: आसाम पूर; रुग्णासाठी परिवहन मंत्री झाले नाविक, होडीतून पोहचवले रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 13:05 IST

आसाममधील पूरस्थिती अतिशय गंभीर झाली आहे, 30 जिल्ह्यांमध्ये 45.34 लाख लोक अजूनही पुराच्या तडाख्यात आहेत.

गुवाहाटी: पुरामुळे आसाम राज्यात हाहाकार माजला आहे. या परिस्थितीत हजारो लोकांना स्थलांतर करावे लागले आहे. अशातच, आजारी व्यक्तींना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. उपचारासाठी दवाखान्यात पोहोचण्यासाठी रस्ता राहिलेला नाही. दरम्यान, एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात आसामचे परिवहन मंत्री परिमल सुक्लाबैद्य स्वतः बोट चालवत एका रुग्णाला पुराच्या पाण्यातून हॉस्पिटलमध्ये नेताना दिसत आहेत. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, आसाममधील बहुतांश पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्या त्यांच्या उपनद्यांसह दुथडी भरून वाहत आहेत. राज्यातील एकूण 35 जिल्ह्यांपैकी 32 जिल्ह्यांचा मोठा भाग पाण्याखाली गेला आहे. अशा परिस्थितीत असामचे परिवहन मंत्री परिमल सुक्लाबैद्य हे एका रुग्णासाठी बोट चालक बनले. डायलिसिसवर असलेल्या रुग्णाला सुकलाबैद्य यांनी एका छोट्या बोटीतून रुग्णालयात नेले.

सध्या राज्यात काही ठिकाणी पुराचे पाणी ओसरले आहे. व्हिडिओमध्ये अनेक लोक बोटीजवळ गुडघ्यापर्यंत पाण्यात चालताना दिसत आहेत. विशेष म्हणजे परिवहन मंत्री परिमल सुक्लबैद्य सध्या सिलचर, कचार येथे तळ ठोकून आहेत. ते स्थानिक आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बराक खोऱ्यातील पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, आसाममधील पूरस्थिती गंभीर आहे आणि 30 जिल्ह्यांमध्ये 45.34 लाख लोक अजूनही पुराच्या तडाख्यात आहेत. सर्वाधिक प्रभावित बारपेटा जिल्ह्यात 10,32,561 लोक पुरामुळे त्रस्त आहेत. 

टॅग्स :Assamआसामfloodपूर