शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आमचा चहा बदनाम करण्यासाठी परदेशात कट; टुलकिट खुलाशावर पंतप्रधानांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 13:38 IST

आसामच्या भूमीवर कट रचणाऱ्यांना यशस्वी होऊ देणार नाही, पंतप्रधानांचं वक्तव्य

ठळक मुद्देआसामच्या भूमीवर कट रचणाऱ्यांना यशस्वी होऊ देणार नाही, पंतप्रधानांचं वक्तव्यपूर्वोत्तर भागाला विकासासाठी वाट पाहावी लागली : पंतप्रधान मोदी

पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममध्ये ७ हजार ७००कोटी रुपयांच्या 'असोम माला' प्रकल्पाचाचा शुभारंभ केला. याव्यतिरिक्त राज्यात दोन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासाठी भूमिपूजनही करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. पंतप्रधानांनी ग्रेटा थनबर्गच्या टुलकिट खुलाशावरही उत्तर दिलं. "आज देशाला बदनाम करण्यासाठी कट रचणारे या स्तरावर पोहोचले आहेत की त्यांनी भारताचा चहाही सोडला नाही. भारताच्या चहाची प्रतीमा मलिन करायची असल्याचं हे कट रचणारे म्हणत आहेत. काही दस्तऐवज समोर आले आहेत. भारताची ओळख ज्या चहाशी आहे त्यावर हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं यातून समोर आलं आहे," असं पंतप्रधान मोदी म्हणाले. "तुम्हाला हे सर्व चालणार आहे का? हा हल्ला करणाऱ्यांचं कौतुक तुम्हाला मान्य आहे का? या सर्व राजकीय पक्षांना भारताचा चहाची बाग असलेलं ठिकाणच उत्तर देईल. भारताच्या चहावर करण्यात येणाऱ्या हल्ल्यांमध्ये इतकी ताकद नाही की ते या चहा कामगारांचा सामना करू शकतील," असंही त्यांनी नमूद केलं.आसामच्या भूमीवर या कट रचणाऱ्यांना जे काही कट रचायचे आहेत ते रचू दे. परंतु आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही. माझा चहा कामगार ही लढाई नक्कीच जिंकणार असल्याचंही ते म्हणाले. "हिंसाचार, भेदभाव, तणाव, पक्षपात, संघर्ष या सर्व गोष्टींना मागे सोजून आता संपूर्ण पूर्वोत्तर भाग विकासाच्या मुद्द्यावर पुढे जात आहे. यामध्ये आसामनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऐतिहासिक बोडो करारानंतर नुकतंच बोडोलँड भागातील निवडणुकांनंतर या ठिकाणी विकासाचा नवा अध्याय लिहिला आहे," असं मोदी यांनी नमूद केलं. पूर्वोत्तर भागाला विकासासाठी वाट पाहावी लागलीसूर्योदय सर्वप्रथम पूर्वोत्तर भागात होतो. परंतु आराम आणि पूर्वोत्तर भागाला विकासासाठी मोठी वाट पाहावी लागली. असं का झालं? ही तिच भूमी आहे ज्यावर लोकांनी परदेशी आक्रमणकर्त्यांशी युद्ध केलं होतं. १९४२ मध्ये याच भूमिवर आसामच्या स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं होतं. त्यांचं बलिदान, त्यांचं साहस आमचा संकल्प अधिक मजबूत करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानAssamआसाम