आसाममध्ये स्फोट ; एक ठार, चार जण जखमी

By Admin | Updated: January 19, 2016 18:12 IST2016-01-19T18:12:03+5:302016-01-19T18:12:03+5:30

आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात ग्रेनेडचा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटात एक महिला ठार झाली असून चार जण जखमी झाले आहेत.

Assam blast; One killed and four injured | आसाममध्ये स्फोट ; एक ठार, चार जण जखमी

आसाममध्ये स्फोट ; एक ठार, चार जण जखमी

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ -  आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात ग्रेनेडचा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटात एक महिला ठार झाली असून चार जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील दिफू येथील जिल्हा मुख्यालयाजवळ हा ग्रेनेडचा स्फोट झाला. या स्फोटात एक महिला ठार झाली, तर चार जण जखमी झाले आहेत. तुनी बेगम असे या मृत महिलेचे नाव असल्याचे समजते. तसेच, जखमींना येथील जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 

Web Title: Assam blast; One killed and four injured