शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार जिग्नेश मेवाणी यांना पुन्हा अटक, काही वेळापूर्वीच मिळाला होता जामीन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 18:24 IST

Jignesh Mevani : आमदार जिग्नेश मेवाणी यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. सोमवारी जामीन मिळाल्यानंतर त्यांना आणखी एका प्रकरणात अटक करण्यात आली.

मुंबई : आसाम पोलिसांनी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना पुन्हा एकदा अटक केली आहे. जिग्नेश मेवाणी यांना त्यांच्या ट्विटशी संबंधित एका प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर आसामच्या बारपेटा पोलिसांनी त्यांना आणखी एका प्रकरणात पुन्हा अटक केली आहे. जिग्नेश मेवाणीचे वकील अंगशुमन बोरा यांनी मीडियाला ही माहिती दिली आहे.

आमदार जिग्नेश मेवाणी यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. सोमवारी जामीन मिळाल्यानंतर त्यांना आणखी एका प्रकरणात अटक करण्यात आली. पुन्हा अटक केल्यानंतर जिग्नेश मेवाणी यांना कोक्राझार जिल्ह्यातून बारपेटा येथे नेण्यात येत आहे. आसाममधील कोक्राझार येथील न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या ट्विट प्रकरणी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना सोमवारी जामीन मंजूर केला. 

कोक्राझार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भावना काकोटी यांनी त्यांना अनेक अटींसह जामीन मंजूर केला आहे. सुनावणीनंतर मेवाणीला कोक्राझार तुरुंगात परत नेण्यात आले आणि त्यांच्या वकिलांनी सांगितले की जामीन बाँडशी संबंधित औपचारिकता पूर्ण केली जात आहे. मात्र आता त्याला आणखी एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

याआधी जिग्नेश मेवाणींना 19 एप्रिलला केली होती अटक!दरम्यान, जिग्नेश मेवाणी यांना 19 एप्रिल रोजी गुजरातमधील पालनपूर शहरातून अटक करण्यात आली होती. कोक्राझार पोलीस ठाण्यात त्यांच्या एका ट्विटवर एफआयआर नोंदवण्यात आला होता, ज्यात त्यांनी म्हटले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी गोडसे यांना देव मानतात. दरम्यान, आमदार जिग्नेश मेवाणी यांना ट्रान्झिट रिमांडवर कोक्राझार येथे आणण्यात आले होते आणि कोक्राझारच्या मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी 21 एप्रिलला त्यांना तीन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली होती.

टॅग्स :Jignesh Mevaniजिग्नेश मेवानीAssamआसामCrime Newsगुन्हेगारी