भाजपाच्या सुंदर महिला आमदारामुळे आसाम विधानसभा चर्चेत
By Admin | Updated: May 23, 2016 16:57 IST2016-05-23T16:51:07+5:302016-05-23T16:57:34+5:30
भाजपच्या आसाममधील विजया इतकीच आसामच्या निर्वाचित आमदार अंगुरलता डेकाचीही चर्चा आहे.

भाजपाच्या सुंदर महिला आमदारामुळे आसाम विधानसभा चर्चेत
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - ईशान्य भारतातील महत्वाचं राज्य असलेल्या आसाममध्ये भाजपने प्रथमच घवघवीत यश संपादन केलं. भाजपच्या या विजयाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. भाजपच्या या विजया इतकीच आसामच्या निर्वाचित आमदार अंगुरलता डेकाचीही चर्चा आहे.
सोशल मिडीया आणि व्हॉटस अॅपवर अंगुरलताचे हॉट, ग्लॅमरस फोटो फिरत आहेत. अंगुरलताने भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. आसामच्या नागाव जिल्ह्यातील बातड्रोबा मतदारसंघातून अंगुरलताने काँग्रेसच्या सलग तीन टर्म निवडून येणा-या आमदाराचा पराभव केला.
डिसेंबर २०१५ मध्ये अंगुरलताने भाजपमध्ये प्रवेश केला होता. सलग १५ वर्ष आमदार असलेल्या काँग्रेसच्या गौतम बोरा यांचा अंगुरलताने ५८८५ मतांनी पराभव केला. अंगुरलताने अनेक बंगाली आणि आसामी चित्रपटातून काम केले आहे.
महत्वाचे म्हणजे अंगुरलता ज्या मतदारसंघातून विजयी झाली तिथे मुस्लिम मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. बांगलादेशातून भारतात आलेले अनेक मुस्लिम तिथे आहेत.