मोदींच्या लाटेत आसामही सामील
By Admin | Updated: May 17, 2014 04:33 IST2014-05-17T04:33:55+5:302014-05-17T04:33:55+5:30
मोदी यांच्या झंझावाताने ईशान्य भारतातही घुसत आसामात गेल्या तीन निवडणुकांत सत्तेवर आलेल्या कॉँग्रेसची झोप उडवली.

मोदींच्या लाटेत आसामही सामील
मोदी यांच्या झंझावाताने ईशान्य भारतातही घुसत आसामात गेल्या तीन निवडणुकांत सत्तेवर आलेल्या कॉँग्रेसची झोप उडवली. तेथे १४ पैकी ७ जागांवर भाजपाने विजय संपादन केला. कॉँग्रेसला अवघ्या तीन, एआययूडीफला तीन व एक अपक्षाला प्राप्त झाली. ईशान्येतील इतर छोट्या राज्यांमध्ये पूर्वीपासून कॉँग्रेसचा प्रभाव राहिला असला तरी तेथील दुर्गम राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य राहिले आहे. अरुणाचलमध्ये एक कॉँग्रेसला व एक भाजपाला मिळविता आली. मेघालयमध्ये शिलॉँगची जागा कॉँग्रेस व तुरा ही जागा पूर्णो संगमांच्या नेतृत्वाखाली नॅशनल पीपल्स पार्टीने राखली. नागालॅँडची एक जागा भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या एनसीएफने राखली. हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये इनर मणिपूरची कॉँग्रेसला व आउटर मणिपूरची जागा नागा पीपल्स फ्रंटला प्राप्त झाली. मिझोराममध्ये एकमेव जागा कॉँग्रेसने राखली.