एटीएम कार्डची माहिती विचारून पन्नास हजारांचा गंडा
By Admin | Updated: September 6, 2016 00:27 IST2016-09-05T22:59:34+5:302016-09-06T00:27:54+5:30
नाशिक : बँकेतून बोलत असल्याचे सांगून भगूर येथील एका ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून सुमारे पन्नास हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार रविवारी (दि़४) उघडकीस आला़

एटीएम कार्डची माहिती विचारून पन्नास हजारांचा गंडा
नाशिक : बँकेतून बोलत असल्याचे सांगून भगूर येथील एका ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून सुमारे पन्नास हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार रविवारी (दि़४) उघडकीस आला़
देवळाली कॅम्प पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाणेगाव रोडवरील सैनिक सोसायटीत शंकर लिंबाजी साळुंखे (६२) राहतात़ १० व ११ ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते चार या वेळेत त्यांना ९१७६३११७४६९७ व ९२२३९६६६६६ या मोबाइलवरून फोन आला़ संबंधित व्यक्तीने बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडियातील एटीएम कार्डचा नंबर तसेच पिन विचारून घेतला़ यानंतर साळुंखे यांच्या बँक खात्यातून ४८ हजार १५९ रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेतले़
याप्रकरणी साळुंखे यांच्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)