उत्तराखंड मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची विजय दर्डा यांच्याकडून विचारपूस

By Admin | Updated: June 27, 2014 01:58 IST2014-06-27T01:58:57+5:302014-06-27T01:58:57+5:30

संसद सदस्य आणि लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे चेअरमन विजय दर्डा यांनी गुरुवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांची भेट घेत त्यांच्या शीघ्र स्वास्थ्यलाभाची कामना केली़

Asked about the health of Uttarakhand Chief Minister Vijay Darda | उत्तराखंड मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची विजय दर्डा यांच्याकडून विचारपूस

उत्तराखंड मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची विजय दर्डा यांच्याकडून विचारपूस

>नवी दिल्ली : संसद सदस्य आणि लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे चेअरमन विजय दर्डा यांनी गुरुवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांची भेट घेत त्यांच्या शीघ्र स्वास्थ्यलाभाची कामना केली़
गत 15 जूनला देहरादून ते दिल्ली मार्गावर हेलिकॉप्टरच्या आपत्कालीन लँडिंगदरम्यान रावत जखमी झाले होत़े येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ या अपघातात त्यांच्या मानेचे हाड तुटले असून पाठीला मार बसला आह़े उठण्या-बसण्यासाठी त्यांना दुस:याची मदत घ्यावी लागत आह़े
 दर्डा यांनी राज्यसभेत त्यांच्या बाजूच्या आसनावर बसणा:या रावत यांची आस्थेने विचारपूस केली़ प्रकृती स्वास्थ्यासोबतच उत्तराखंडातील जलप्रलय आणि प्रभावित भागांबद्दलही त्यांनी माहिती जाणून घेतली़  ‘इशूज बिफोर पार्लियामेंट’ या आपल्या नवप्रकाशित पुस्तकाची प्रतही त्यांनी रावत यांना भेट म्हणून दिली़ 
अपघाताच्या वेळी रावत यांच्यासोबत त्यांचे ओएसडी नंदनसिंह हेही हेलिकॉप्टरमध्ये होत़े दर्डा यांनी त्यांचीही भेट घेतली़
काल रात्रीच दर्डा विदेश दौ:यावरून परतले आणि आज गुरुवारी सकाळी 1क्.3क् वाजता रावत यांच्या भेटीसाठी पोहोचल़े बद्रीनाथ, श्री केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष, माजी आमदार गणोश गोदियाल, गंगोत्रीचे आमदार विजयपाल सजवान, ‘उत्तरांचल का सच’चे संपादक राहुल भाटिया आणि नागपूरचे सुपुत्र आणि भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी नीलेश भरणो हेही यावेळी उपस्थित होत़े
रावत यांच्या भेटीनंतर दर्डा यांनी सांगितले की, श्रीनगरमधून दोनदा आमदार राहिलेले गोदियाल हेही मूळचे महाराष्ट्रातील ठाण्याचे आहेत आणि अस्सल मराठीचे जाणते आहेत़ नीलेश भरणो उत्तराखंडात वरिष्ठ पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत़ केदारनाथमध्ये जलप्रलयानंतरच्या मदतकार्यात भरणो यांचे अपूर्व योगदान राहिले होत़े यासाठी उत्तराखंड सरकारने त्यांचा गौरवही केला होता़ दर्डा यांनी सांगितले की, मूळचे नागपूरवासी असलेल्या भरणो यांचा प्रत्येक विदर्भवासीयाला गर्व आह़े देहरादूनमधील आपले निवासस्थान त्यांनी नैसर्गिक आपत्ती पीडित विद्याथ्र्यासाठीच्या वसतिगृहात रूपांतरित केल़े या ठिकाणी अद्यापही सहा पीडित विद्यार्थी राहत आहेत़ येथे 15 पीडित विद्याथ्र्याची व्यवस्था करण्याची त्यांची योजना आह़े
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Asked about the health of Uttarakhand Chief Minister Vijay Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.