आयएएस प्रवेश वयोमर्यादेबाबत राज्यांना विचारणा
By Admin | Updated: December 27, 2014 00:20 IST2014-12-27T00:20:39+5:302014-12-27T00:20:39+5:30
राज्य सेवा अधिकाऱ्यांना आयएएस व आयपीएससह अन्य सेवांमध्ये सामील करून घेण्याकरिता ५४ वर्षांच्या विद्यमान वयोमर्यादेत वाढ

आयएएस प्रवेश वयोमर्यादेबाबत राज्यांना विचारणा
नवी दिल्ली : राज्य सेवा अधिकाऱ्यांना आयएएस व आयपीएससह अन्य सेवांमध्ये सामील करून घेण्याकरिता ५४ वर्षांच्या विद्यमान वयोमर्यादेत वाढ करण्याबाबत केंद्राने राज्य सरकारांना त्यांचा अभिप्राय विचारला आहे. भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा व भारतीय वन सेवेमध्ये राज्य सरकारातील अधिकाऱ्यांना सामील करण्याबाबत विचार करण्यासाठी वयाची कमाल मर्यादा ५४ वर्षांची आहे. राज्य सेवेतील काही अधिकाऱ्यांनी या सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. त्यांच्या मते, या मर्यादेला वाढवून दिले पाहिजे, केंद्रात सेवानिवृत्तीचे वय ६० करण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)