शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीवेळी पक्कं बिल मागा, १ कोटी रुपये जिंका; केंद्र सरकारची मोठ्ठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 18:47 IST

या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना पक्की बिले घेण्यास प्रोत्साहित केले जाईल

ठळक मुद्दे१ एप्रिलपासून दरमहा खरेदीचे प्रत्येक बिल लकी ड्रॉमध्ये समाविष्ट केले जाईल.याअंतर्गत खरेदी करणार्‍याला एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळू शकते.

नवी दिल्ली - कोणत्याही दुकानातून खरेदी करताना पक्कं बिल घेण्यास विसरू नका कारण त्यामुळे तुम्ही एक कोटी रुपये सहज जिंकू शकता. वस्तुतः केंद्र सरकारने वस्तू व सेवा करामध्ये (GST) कोणताही गैरव्यवहार होऊ नये आणि होत असल्यास त्याला रोखण्यासाठी लॉटरी प्रणाली सुरू करण्याच्या योजनेवर काम सुरु केले आहे. त्याअंतर्गत १ एप्रिलपासून दरमहा खरेदीचे प्रत्येक बिल लकी ड्रॉमध्ये समाविष्ट केले जाईल. या लॉटरीसंदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, याअंतर्गत खरेदी करणार्‍याला एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळू शकते. ते पुढे म्हणाले की, या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना पक्की बिले घेण्यास प्रोत्साहित केले जाईल, GST मध्ये गैरव्यवहार म्हणजेच करचुकवेगिरी करण्यास रोख लावण्यास सरकारला मदत होऊ शकेल.केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाच्या (सीबीआयसी) अधिकाऱ्याने गेल्या महिन्यात माहिती दिली होती की, या लॉटरी योजनेत दहा लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतची बक्षिसे ठेवण्यात येणार आहेत. जीएसटी परिषद आपल्या पुढच्या बैठकीत यावर निर्णय घेऊ शकते. परिषदेची पुढील बैठक १४ मार्च रोजी होणार आहे.

बिल कोणतेही असू दे!अधिकारी म्हणाले की, कितीही रक्कम असलेले बिल असले तरी आपण ही सोडत जिंकू शकता. याचा अर्थ असा की, खरेदीच्या व्यवहारासाठी कोणतीही किमान किंवा कमाल रक्कमेची मर्यादा नाही. या लॉटरी प्रणालीतील प्रथम लॉटरी विजेत्यास मोठे पारितोषिक देण्यात येईल. याव्यतिरिक्त, दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकाच्या विजेत्यांची राज्य स्तरावर निवड केली जाऊ शकते.आजपासून SBI, HDFC च्या नियमांमध्ये मोठे बदल; जाणून घेणे फायद्याचे

 

या लॉटरी प्रक्रियेत कसे सहभागी व्हावेGSTN  ही लॉटरी प्रक्रिया सुरळीत चालविण्यासाठी अ‍ॅप विकसित करीत आहे. या महिन्याच्या शेवटी, अँड्रॉइड आणि आयओएस यूजर्ससाठी अ‍ॅप उपलब्ध होईल. या लॉटरी योजनेत सहभागी होण्यासाठी यूजर्संना खरेदी केल्याची पावती स्कॅन करुन ती या अ‍ॅपवर अपलोड करावी लागेल.

सरकार कुठून पैसे देईल?सरकारी तिजोरीत दंडातून येणारी रक्कम ही लॉटरीत दिली जाईल. जीएसटी कायद्यानुसार गैरमार्गाने स्वतःचा फायदा करणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते. दंडाची रक्कम ग्राहक कल्याण निधीमध्ये जमा केला जातो.

 

 

टॅग्स :GSTजीएसटीCentral Governmentकेंद्र सरकारbillबिल