शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 13:10 IST

Asia Cup 2025 Ind vs Pak fina : ... या निर्णयासाठी मी भारतीय संघाचे आणि कर्णधार सूर्यकुमार यादवचे आभार मानतो.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या वडिलांनी आशिया कप क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी न घेतल्याबद्दल भारतीय संघाचे कौतुक केले आहे. यासंदर्भात बोलताना विनय नरवाल यांचे वडील राजेश नरवाल म्हणाले, भारतीय संघाने असे करून अगदी योग्य संदेश दिला आहे की, खेळ वेगळी गोष्ट आहे, मात्र आम्ही आपल्यासोबत संपर्क ठेवणार नाही. भारतीय संघाने पाकिस्तानला दहशतवादासंदर्भात थेट मेसेज दिला आहे. या निर्णयासाठी मी भारतीय संघाचे आणि कर्णधार सूर्यकुमार यादवचे आभार मानतो.

कर्णधार सूर्यकुमार यादवची मोठी घोषणा - भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आशिया कपमधील सर्व सामन्यांची संपूर्ण फीस पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातलगांना समर्पित केली. एवढेच नाही तर, माझी प्रार्थना नेहमीच पहलगाम हल्ल्यातील पीडितांसोबत राहील, असेही यादवने म्हटले आहे.

भारतीय संघाने खेळण्याचा निर्णय घेतला, पण - खरे तर, आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळावे की नाही, यासंदर्भात बरीच चर्चा सुरू होती. अखेर बीसीसीआयने निर्णय घेतला की भारत मैदानात उतरेल. यासाठी, भारत मैदानात उतरला नाही, तर पाकिस्तानला वॉकओव्हर मिळेल, असे कारण देण्यात आले होते. यामुळे भारतीय संघाने खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले जाणार नाही, असे ठरवले होते. 

याशिवाय भारतीय संघाने ट्रॉफी देखील पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांच्या हातून घेण्यास नकार दिला. हेच मोहसिन नकवी भारताविरोधात सातत्याने गरळ ओकत असतात.  

English
हिंदी सारांश
Web Title : Pahalgam victim's father praises India for snubbing Asia Cup trophy.

Web Summary : Father of Lieutenant Vinay Narwal, killed in the Pahalgam attack, lauded Team India for refusing the Asia Cup trophy from Pakistani officials. He appreciated the team's message against terrorism. Captain Suryakumar Yadav dedicated match fees to the victims' families and refused to shake hands with Pakistani players.
टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघ