शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

डोळ्यादेखत घर अन् गाडी गमावली! तरीदेखील 'जवान' ड्युटीवर तैनात; स्वत: सांगितली आपबीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 16:15 IST

हिमाचल प्रदेशमधील काही जिल्हे भूस्खलनाच्या तडाख्यात सापडले आहेत.

मंडी : हिमाचल प्रदेशमधील काही जिल्हे भूस्खलनाच्या तडाख्यात सापडले आहेत. अनेकांनी डोळ्यादेखत आपली घरं मातीत मिसळताना पाहिली. आठवडाभरापूर्वीच सुट्टीवर गावी गेलेल्या पोलीस जवानाला देखील याचा प्रत्यय आला अन् त्यानं आपली आपबीती सांगितली. माझ्या डोळ्यासमोर जमीन खचू लागली आणि नंतर माझे तीन मजली घर, नवीन कार जमीनदोस्त झाली, असे हिमाचलचे पोलीस हवालदार अशोक गुलेरिया यांनी सांगितले. 

हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील सरकाघाटमध्ये एका माजी सैनिकाचे आणि हिमाचल पोलीस हवालदाराचे तीन मजली घर आणि गाडी भूस्खलनाच्या तडाख्यात आली. संपूर्ण घर कोसळल्याने त्याचं छत्र हरपलं. खरं तर १४ ऑगस्ट रोजी मंडी जिल्ह्यातील सरकार ताटीह इथे अशोक गुलेरिया यांचे घर भूस्खलनात सापडले. घर ढासळत असल्याचा थरार गुलेरिया यांनी पाहिला. पण, ते काहीच करू शकले नाहीत अन् त्यांच्या गाडीसह संपूर्ण घर जमीनदोस्त झाले. 

डोळ्यादेखत घर जमीनदोस्त दरम्यान, माजी सैनिक आणि विद्यमान पोलीस हवालदार अशोक गुलेरिया हे सुट्टीसाठी मंडी येथे त्यांच्या गावी गेले होते. ते शिमला इथे तैनात असतात. १७ वर्षांपासून पोलीस विभागात कार्यरत असलेल्या अशोक यांनी सांगितलेला हा थरार हृदयद्रावक आहे. आधी ते सैन्यात होते आणि निवृत्तीनंतर पोलीस खात्यात रुजू झाले. दोन वर्षांपूर्वी त्यांनी तीन मजली घर बांधले असून ते आता नाहीसे झाले आहे.  जवानाची व्यथा अशोक यांच्या मुलीचे लग्न झाले असून मुलगा चंदीगड येथे नोकरी करतो. घर आणि गाडी भूस्खलनाच्या तडाख्यात सापडल्याने जवळपास एक कोटी रूपयांचे नुकसान झाले असल्याचे ते सांगतात. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळणाऱ्या या घराचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशlandslidesभूस्खलनIndian Armyभारतीय जवानPoliceपोलिस