शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

...तर CAA मुळं सर्वातआधी मलाच डिटेन्शन कॅम्पमध्ये जावं लागेल : अशोक गेहलोत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 13:09 IST

CAA and NRC : राज्यातील राजस्थान सरकार आणि काँग्रेस येथील आंदोलकांच्या पाठिशी आहे. गरज भासल्यास डिटेन्शन सेंटरला जाणारा मीच पहिला ठरेल असं गेहलोत यांनी सांगितले.

नवी दिल्ली - देशभरात नागरिकता संशोधन कायद्याला (CAA) सुरू असलेला विरोध कायम आहे. दिल्लीतील शाहीन बागेसह अनेक राज्यांत गेल्या अनेक दिवसांपासून या कायद्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. तर अनेक राज्यांतील राज्य सरकारने या कायद्याविरोधात विधानसभेत विरोध प्रस्ताव पास करून घेतला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी देखील केंद्र सरकारच्या सीएए, एनआरसी आणि एनपीआर याविरोधात भूमिका घेतली आहे. या कायद्यांमुळे मलाच सर्वात आधी डिटेन्शन कॅम्पमध्ये जावं लागेल, असं गेहलोत यांनी म्हटले आहे.

देशातील शांतता कायम राखण्यासाठी हा कायदा सरकारने मागे घेण्याची विनंती गेहलोत यांनी केली आहे. एनडीए सरकारने या कायद्यावर पुनर्विचार करावा. देशाच्या संविधानाच्या विरोधात हा कायदा आहे. त्यामुळे सरकारने पुढे येऊन हा कायदा मागे घ्यायला हवा. जेणेकरून देशात शांती आणि सौदार्ह टिकून राहिल, असंही गेहलोत यांनी सांगितले. त्यांनी जयपूर येथे सीएएविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यातील राजस्थान सरकार आणि काँग्रेस येथील आंदोलकांच्या पाठिशी आहे. गरज भासल्यास डिटेन्शन सेंटरला जाणारा मीच पहिला ठरेल असं गेहलोत यांनी सांगितले. तसेच आई-वडिलांच्या जन्मस्थळाविषयीची माहिती एनपीआरसाठी (राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी) मागितली जात आहे. मी ती माहिती देऊ शकत नाही. कारण मलाही त्याची माहिती नाही. त्यामुळे तुम्ही निश्चित राहा, डिटेन्शन सेंटरमध्ये जाण्याची वेळ आली तर मलाच सर्वात आधी जावं लागेल, अस गेहलोत उपस्थितांना म्हणाले.  

टॅग्स :National Register of CitizensएनआरसीAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक