आशा भोसलेंच्या मुखी ' हर हर मोदी'

By Admin | Updated: March 11, 2017 13:39 IST2017-03-11T13:26:52+5:302017-03-11T13:39:07+5:30

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील विज.ासाठी ज्येष्ठ गायिका आसा भोसले यांनी मोदींना शुुभेच्छा दिल्या आहेत.

Asha Bhosale's face 'Har Har Modi' | आशा भोसलेंच्या मुखी ' हर हर मोदी'

आशा भोसलेंच्या मुखी ' हर हर मोदी'

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने ३०० हून अधिक जागा जिंकत 'भगवी होळी' साजरी केली. भाजपाच्या या यशामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी फटाके फोडत मोठ्या उत्साहात जल्लोष केला. सोशल मीडियावरही भाजपाचा बोलबाला दिसतोय.  
 
दरम्यान भाजपाच्या या विजयावर अनेक दिग्गजांनीही प्रतिक्रिया व्यक्त करत शुभेच्छा दिल्या आहेत. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीही ट्विट करून 'हर हर मोदी'चा नारा दिला आहे. भारतीय लोकशाहीचा एक भाग असल्याचा मला अभिमान वाटतो. आता पुढच्या लोकसभा निवडणुकीत कोणाचा विजय होणार हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही' असं ट्विट करत त्यांनी भाजपा आणि मोदी सरकारचे कौतुक केले आहे.

Web Title: Asha Bhosale's face 'Har Har Modi'