आसाराम प्रकरण; साक्षीदारावर पुन्हा एकदा चाकूहल्ला
By Admin | Updated: February 14, 2015 00:39 IST2015-02-14T00:39:01+5:302015-02-14T00:39:01+5:30
आसाराम बापूविरुद्धच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील एका साक्षीदारावर शुक्रवारी भर न्यायालयात चाकूहल्ला करण्यात आला

आसाराम प्रकरण; साक्षीदारावर पुन्हा एकदा चाकूहल्ला
जोधपूर : आसाराम बापूविरुद्धच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील एका साक्षीदारावर शुक्रवारी भर न्यायालयात चाकूहल्ला करण्यात आला. साक्षीदारावर चाकूहल्ला करणाऱ्याने आपण आसाराम बापूचा भक्त असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, याआधी आसारामविरुद्ध साक्षीदार बनलेल्या दोन जणांची हत्या करण्यात आली.
आसाराम बापूच्या आश्रमात सेवादार राहिलेला राहुल सचान हा बंदोबस्तात साक्ष देण्यासाठी आला होता. साक्षीनंतर बंदोबस्तात तो पोलीस जीपमध्ये चढताना त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला, अशी माहिती फिर्यादी पक्षाचे वकील पी. सी. सोळंकी यांनी दिली. सत्यनारायण असे हल्लेखोराचे नाव आहे. त्याने राहुलच्या कमरेत चाकू खुपसला. हल्ला केल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सत्य नारायणला पोलिसांनी अटक केली. सध्या राहूल याच्यावर उपचार सुरू आहेत. (वृत्तसंस्था)