शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कारागृहात आसारामसह इतर कैद्यांचेही उपोषण, सुटका करण्याची करतायेत मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 14:29 IST

ज्या कैद्यांना पॅरोलवर सोडले जाऊ शकते, अशा कैद्यांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. ही यादी राज्य सरकारकडे पाठवली जाणार आहे.  यानंतर कुणाला पॅरोल द्यायचा आणि कुणाची शिक्षा कमी करायची यावर राज्य सरकार निर्णय घेईल.

ठळक मुद्देआसारामसह राजस्थान सरकारचे माजी मंत्री महिपाल मदेरणाही जोधपूर कारागृहात आहेज्या कैद्यांना पॅरोलवर सोडले जाऊ शकते, अशा कैद्यांची यादी तयार देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ५६०वर 

जयपूर - जोधपूर येथील मध्यवर्ती कारागृहात कैद असलेले आसाराम आणि राजस्थान सरकारचे माजी मंत्री महिपाल मदेरणा यांच्यासह इतर कैद्यांनी उपोषण सुरू केले आहे. कारागृहात कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी सुटकेची मागणी केली आहे. 

या कैद्यांनी कारागृह प्रशासनाला पंतप्रधान, मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालय आणि राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या नावे आपल्या सुटकेची मागणी करणारे पत्र सोपवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूर मध्यवर्ती कारागृहात सध्या 1375 कैदी आहेत.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर येथील कैद्यांनी मंगळवारी उपोषण केले. सकाळच्या वेळी कारागृहात भोजन बनवण्यात आले होते. मात्र, या कैद्याने भोजन करण्यास नकार दिला. हे कैदी कारागृहातून सुटका करण्याची मागणी करत आहेत. यानंतर आता प्रशासनाने, ज्या कैद्यांना पॅरोलवर सोडले जाऊ शकते, अशा कैद्यांची यादी तयार केली असून ही यादी राज्य सरकारकडे पाठवली जाणार आहे.  यानंतर कुणाला पॅरोल द्यायचा आणि कुणाची शिक्षा कमी करायची यावर राज्य सरकार निर्णय घेईल.

राजस्थानातील भीलवाडा येथे आतापर्यंत तब्बल 13 तर झुंझनूं येथे 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांपासून भीलवाडा आणि झुंझुनूं येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

देशातील कोरोनाचा आकडा 107वर -

कोरोना विषाणूनं भारतात थैमान घातलं असून, बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ५६०वर गेली असून, आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४६ जणांची या जीवघेण्या रोगातून सुखरूप मुक्तता झाली आहे. महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या १०७वर गेली असून, केरळमध्ये कोरोनानं बाधित झालेले १०५ रुग्ण समोर आले आहेत. विशेष म्हणजे या कोरोनाग्रस्तांमध्ये ४१ विदेशी नागरिकांचा समावेश आहे.

...तर 13 लाखांवर पोहोचू शकतो भारतातील कोरोना ग्रस्तांचा आकडा

भारतातील कोरोनाग्रस्त आणि संसर्ग पाहून शास्त्रज्ञांनी एक इशारा दिला आहे. शास्त्रज्ञांच्या मते भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या अशीच वाढल्यास मेपर्यंत ही संख्या तब्बल 13 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञ आणि संशोधक यांनी कमी टेस्ट केल्या आहेत. इतर देशांपेक्षा भारतात ही संख्या कमी आहे. 18 मार्चपर्यंत भारतात केवळ 11 हजार 500 चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे ही गोष्ट भारतासाठी चिंताजनक आहे. न्यूज़ एजन्सी IANS च्या एका रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. भारतात कोरोनाचा अभ्यास करणाऱ्या COV-IND-19 स्टडी ग्रुपच्या रिसर्चची आकडेवारी पाहून ही शंका व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Asaram Bapuआसाराम बापूcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याJodhpur courtजोधपूर न्यायालयRajasthanराजस्थानjailतुरुंग