असदुद्दीन ओवेसी यांची जीभ कापणा-याला 21 हजारांचं बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2016 14:32 IST2016-03-16T14:32:17+5:302016-03-16T14:32:17+5:30
एमआयएम अध्यक्ष तथा हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांची जीभ कापणा-याला 21 हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे

असदुद्दीन ओवेसी यांची जीभ कापणा-याला 21 हजारांचं बक्षीस
ऑनलाइन लोकमत -
लखनऊ, दि. १६ - ऑल इंडिया मजलीस इत्तेहदुअल मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष तथा हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांची जीभ कापणा-याला 21 हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष दुष्यंत तोमर याने हे बक्षीस जाहीर केलं आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी 'भारत माता की जय बोलणार नाही', असं वक्तव्य केल्याने माझ्या रागाचा पारा चढला आहे असं दुष्यंत तोमरने म्हंटलं आहे.
'ओवेसी यांचं वक्तव्य फक्त देशविरोधी नाही, तर यातून ते अजिबात देशभक्त नाहीत हे दिसतं', असं दुष्यंत तोमर बोलला आहे. दुष्यंत तोमर हा 2014-15 मध्ये विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होता. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं (ABVP) सदस्यपद देखील देण्यात आलं होतं. ओवेसी यांची लोकसभा खासदारपदावरुन हाकलपट्टी केली पाहिजे अशी मागणीदेखील दुष्यंत तोमरने केली आहे. ओवेसी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर लखनऊमध्ये न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे.