शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपा सत्तेत आल्यास ओवैसींना निजामाप्रमाणे हैदराबाद सोडून पळावं लागेल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 17:35 IST

असदुद्दीन ओवैसी यांना योगी आदित्यनाथ यांचा इशारा

हैदराबाद: तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी काँग्रेस आणि भाजपावर वारंवार बरसत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ओवैसींना थेट इशारा दिला आहे. भाजपा सत्तेत आल्यास ओवैसींना निजामाप्रमाणे हैदराबाद सोडून पळावं लागेल, असं आदित्यनाथ यांनी म्हटलं. योगी आदित्यनाथ यांच्या या इशाऱ्याला ओवैसी प्रत्युत्तर देणार आहेत. याचे संकेत त्यांनी ट्विटरवरुन दिले आहेत. 'संध्याकाळी 7 ते 10 दरम्यान होणाऱ्या सभेतून योगींना उत्तर दिलं जाईल,' असं ट्विट ओवैसींनी केलं आहे. हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका प्रचारसभेत बोलताना योगी आदित्यनाथ ओवैसींवर बरसले. 'मी तुम्हाला विश्वास देतो की, तेलंगणात भाजपाची सत्ता आल्यास ओवैसींनी निजामासारखं हैदराबाद सोडून पळावं लागेल,' असं योगी आदित्यनाथ म्हणाले. याआधी भाजपाचे आमदार राजा सिंह यांनी ओवैसींबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. 'ओवैसींचं शीर धडावेगळं केल्यावरच मी संतुष्ट होईन,' असं राजा सिंह यांनी म्हटलं होतं. याआधी असदुद्दीन ओवैसी यांनी सैदाबादमधील एका सभेत बोलताना भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. 'मुस्लिमांची धार्मिक स्थळं, मदरसे बंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,' असा आरोप त्यांनी केला होता. तेलंगणात 7 डिसेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यानंतर 11 डिसेंबरला मतमोजणी होईल.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनTelangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018