शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

"शव जाळले जात आहेत अन् यांना रक्ताची 'खुशबू' येतेय; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला PM मोदीच जबाबदार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 11:52 IST

'मृतांचे दफन केले जात आहे. शव जाळले जात आहेत. आणि यांना (मोदी सरकारला) रक्ताची खुशबू (सुगंध) येत आहे. मोदी सरकार अदृश्य झाले आहे.' (Asaduddin Owaisi)

हैदराबाद: भारतात कोरोनाची दुसरी लाट अनियंत्रित झाल्याने, एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ओवेसी म्हणाले, देशात कोरोना महामारी नियंत्रणाबाहेर जाण्यास केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच (Narendra Modi) जबाबदार आहेत. ओवेसी म्हणाले, आपण गेल्या वर्षी लोकांना थाळ्या आणि टाळ्या वाजवायला सांगितले होते, त्याने काय झाले? देशातून कोरोना पळाला?'' (Asaduddin owaisi slams pm Narendra Modi for Corona surge and second wave of coronavirus)

ओवेसी म्हणाले पंतप्रधान मोदींनी रुग्णालायांतीत सुविधा का वाढविल्या नाहीत? केंद्र सरकार तेव्हापासून झोपले होते का?  देशाच्या राजधानित ऑक्सिजन का कमी पडतोय? आपण आत्मनिर्भर भारत आहोत, तर सौदी अरेबिया, रशिया आणि इतर देशांची मदत का घेत आहोत.'

Corona Vaccine: मोठी बातमी! केंद्र सरकार परदेशातून लशींची आयात करणार नाही, राज्यांवर सोडला निर्णय

'मृतांचे दफन केले जात आहे. शव जाळले जात आहेत. आणि यांना (मोदी सरकारला) रक्ताची खुशबू (सुगंध) येत आहे. मोदी सरकार अदृश्य झाले आहे. आमच्याकडे MP फंड असता, तर आम्हाला लोकांना ऑक्सिजन अथवा औषधी देता आली असती. मात्र, आता काहीही नाही, असे ओवेसी म्हणाले.

मोदी सरकारने पीएम केअर्स फंडातील पैसे काढून राज्य सरकारांना द्यायला हवेत. जेने करून त्यांना कोरोना लसीकरणाचा वेग वाढवता येईल, असे म्हणत, सध्या देशात कोरोना लशींच्या तुटवड्याची चर्चा सुरू आहे. असे असेल, तर यापूर्वीच फायझर कंपनीला भारतात लस लॉन्च करण्याची परवानगी का देण्यात आली नही, असा सवालही ओवेसींनी उपस्थित केला.

CoronaVirus: धोकेबाज ड्रॅगन! चीननं आधी पुढे केला मदतीचा हात, आता भारताचा मेडिकल सप्लाय रोखला

ओवेसी म्हणाले, देशात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. असे असतानाही पंतप्रधानांनी रविवारी 'मन की बात'मध्ये केवळ एकदाच ऑक्सिजनचा उल्लेख का केला? माध्यमांना इशारा देताना ओवेसी म्हणाले, ''मोदींच्या माध्यम चमचांनो, जागे व्हा. आपले स्वतःचेच लोक मरत आहेत. आता तरी मोदींचा बाजा वाजविणे थांबवा. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन