नवी दिल्लीः सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशात दोनच मुलं जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा असणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केल्यानंतर त्यांच्यावर एमआयएमचे असदुद्दीन ओवैसींनी पलटवार केला. देशातली खरी समस्या लोकसंख्या नाही, तर बेरोजगारी असल्याचं ओवैसी म्हणाले आहेत. संघाचे मोहन भागवत दोनच मुलं जन्माला घालण्यासंबंधीच्या कायद्यावर बोलत आहेत. आतापर्यंत किती जणांना नोकरी दिली तेसुद्धा सांगा. वर्षं 2018मध्ये सरासरी 36 मुलांनी दररोज आत्महत्या केली आहे. त्यावर तुमचं मत काय?, असा प्रतिप्रश्नही ओवैसींनी भागवतांना विचारला. भारतात 60 टक्के लोकसंख्या ही 40 वर्षांहून कमी वयाच्या मुलांची आहे. त्यावर तुम्ही बोलत का नाही, असं म्हणत ओवैसींनी भागवतांवर टीकास्त्र सोडलं आहे. मुरादाबादमध्ये मोहन भागवत यांनी बंद दाराआड झालेल्या एका चर्चेत देशात दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा आणला पाहिजे, असं म्हटलं आहे. तसेच 'लवकरच एका भव्य राम मंदिराची निर्मिती करण्यात येईल. राम मंदिर ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर संघ राम मंदिराच्या मुद्द्यापासून वेगळा होईल. सध्या देशातील वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय आहे, त्यासाठी दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा आणायला हवा. लोकसंख्या नियंत्रणात येईल,' असं भागवत यांनी चर्चेदरम्यान म्हटलं आहे.
लोकसंख्या नव्हे, तर बेरोजगारी देशाची खरी समस्या, ओवैसींचा भागवतांवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 08:54 IST
देशातली खरी समस्या लोकसंख्या नाही, तर बेरोजगारी असल्याचं ओवैसी म्हणाले आहेत.
लोकसंख्या नव्हे, तर बेरोजगारी देशाची खरी समस्या, ओवैसींचा भागवतांवर पलटवार
ठळक मुद्देदेशातली खरी समस्या लोकसंख्या नाही, तर बेरोजगारी असल्याचं ओवैसी म्हणाले आहेत. संघाचे मोहन भागवत दोनच मुलं जन्माला घालण्यासंबंधीच्या कायद्यावर बोलत आहेत. आतापर्यंत किती जणांना नोकरी दिली तेसुद्धा सांगा. वर्षं 2018मध्ये सरासरी 36 मुलांनी दररोज आत्महत्या केली आहे.