शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

तिहेरी तलाक विधेयकावर असदुद्दीन ओवैसी म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 9:02 AM

तिहेरी तलाक या विधेयकाला काल राज्यसभेत मंजुरी देण्यात आली आहे.

नवी दिल्लीः तिहेरी तलाक या विधेयकाला काल राज्यसभेत मंजुरी देण्यात आली आहे. जवळपास साडेचार तासांच्या पदीर्घ चर्चेनंतर 99 विरुद्ध 84 अशा मतांनी राज्यसभेने हे विधेयक मंजूर केले. त्यानंतर या विधेयकावर विरोधकांनी टीका केली आहे. या ऐतिहासिक निर्णयावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी प्रश्न उपस्थित केले आहेत.ते म्हणाले, मुस्लिम महिलांविरोधात हा अन्याय आहे. तिहेरी तलाक विधेयक हा ऐतिहासिक निर्णय नाही. तीन तलाक हा गुन्हाच आहे. पण केंद्र सरकारनं जे विधेयक मंजूर केलं आहे, त्यामुळे मुस्लिम महिलांच्या अडचणीत वाढ होणार आहे. तीन तलाक कायदा हा एका वर्गाला डोळ्यांसमोर ठेवून बनवण्यात आला आहे. तो सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. सरकारनं मुस्लिम पतीला तुरुंगात डांबलं तरी ही कुप्रथा संपणार नाही. सर्वोच्च न्यायालयानं पॉक्सो अॅक्ट प्रकरणातील निवाड्यासाठी 500 न्यायालयं बनवली, तरीही 9 टक्के प्रकरण अजूनही कायद्याच्या कचाट्यात अडकलेली आहे. भाजपा या विधेयकाला ऐतिहासिक बोलून मुस्लिम महिलांसाठी खोटे अश्रू काढत आहेत. भाजपाला मुस्लिम महिलांची एवढीच चिंता आहे, तर उन्नाव हिंदू बलात्कार पीडितेच्या प्रकरणात ते गप्प का आहेत, असा प्रश्नही ओवैसींनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, तिहेरी तलाकबंदीचा कायदा संसदेकडून मंजूर करून घेण्यात सरकारला मंगळवारी यश आले. या कायद्यास वरिष्ठ सभागृहाची संमती मिळण्याकरता आवश्यक संख्याबळाचे गणित जुळविण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखलेल्या डावपेंचाचा हा मोठा विजय मानला जात आहे. यामुळे सरकारने आजचा दिवस ‘ऐतिहासिक’ असल्याचे म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेतली तर यास प्रखर विरोध केलेल्या काँग्रेससह अन्य विरोधकांनी याचे ‘ऐतिहासिक चूक’ म्हणून वाभाडे काढले. साडेचार तासांच्या घणाघाती चर्चेनंतर 99 विरुद्ध 84 अशा मतांनी राज्यसभेने हे विधेयक मंजूर केले. लोकसभेने ते 25 जुलै रोजीच ते मंजूर केले होते. राष्ट्रपतींची संमती मिळाल्यानंतर ही तिहेरी तलाकबंदी कायदा म्हणून लागू होईल. सध्या हाच कायदा 21 फेब्रुवारी रोजी तिसऱ्यांदा काढलेल्या वटहुकुमाच्या स्वरूपात लागू आहे.एकूण 242 सदस्य असलेल्या राज्यसभेत एरवी विधेयक मंजूर करून घेण्यासाठी किमान 121 मतांची गरज पडली असती. पण 107सदस्य असलेल्या ‘रालोआ’ला एकट्याच्या जिवावर हे करणे शक्य नव्हते. नेमके त्यासाठीच मोदींना डावपेंच आखले. त्याचे फलित म्हणून विधेयकास विरोध असलेल्या जद(यू) व अण्णाद्रमुक या ‘रालोआ’तील दोन घटक पक्षांच्या सदस्यांनी मतदानाच्या वेळी सभात्याग केला. तर आघाडीत नसलेल्या बिजू जनता दलाने विधेयकास पाठिंबा दिला.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी