शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'फसव्या आश्वासनांचं प्रायश्चित्त म्हणून उपोषण करणार का?'; ओवेसींचा मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 17:44 IST

उद्या भाजपकडून करण्यात येणाऱ्या उपोषणावर टीकास्त्र

नवी दिल्ली: संसदेचं कामकाज होऊ न शकल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या स्वपक्षीय खासदारांसह उपोषण करणार आहेत. या उपोषणावर एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीकेची झोड उठवली आहे. 'मोदींनी त्यांच्या खोट्या आश्वासनांचं प्रायश्चित्त म्हणून उपोषण करावं,' अशी टीका ओवेसी यांनी केली आहे. 'दलितांचं कल्याण, तरुणांना रोजगार ही मोदींची सर्व आश्वासनं खोटी ठरली. या फसव्या आश्वासनांचं प्रायश्चित्त म्हणून मोदी उपोषण करणार का?,' असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला आहे. संसदेचं कामकाज गदारोळामुळे वाया गेलं. त्यामुळे अनेक विधेयक मंजूर होऊ शकली नाहीत. यासाठी भाजपनं काँग्रेसला जबाबदार धरलं आहे. काँग्रेस खासदारांच्या गदारोळामुळेच संसदेचं कामकाज होऊ शकलं नाही, असा भाजपचा आरोप आहे. त्यामुळे उद्या (गुरुवारी) भाजप खासदार उपोषण करणार आहेत. याबद्दलची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली होती. यावरुन ओवेसी यांनी मोदींवर तोंडसुख घेतलं आहे. 'मोदी त्यांच्या फसव्या आश्वासनांचं प्रायश्चित स्वीकारण्यासाठी उपोषण का करत नाहीत? आत्महत्या केलेले शेतकरी, बेरोजगार तरुण यांच्यासाठी मोदी उपोषण करणार का?,' असे प्रश्न ओवेसींनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केले. 'पंतप्रधान मोदी संसदेच्या कामकाजाचा वेळ वाया गेल्याबद्दल उपोषण करणार आहेत. मग त्यांनी शेतकरी आत्महत्या, कथुवामध्ये अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार, त्या प्रकरणातील भाजप आमदाराला मिळणारी विशेष वागणूक या प्रश्नांवरही उपोषण करावं,' असा सल्ला ओवेसींनी दिला. संसदेचं कामकाज होऊ देणं, भाजपला शक्य होतं. मात्र त्यांनी जाणूनबुजून संसदेचं कामकाज होऊ दिलं नाही, असा आरोपही त्यांनी केला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी