शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

"दार उघडताच..."; TTD अध्यक्ष बीआर नायडू यांनी सांगितलं तिरुपतीत चेंगराचेंगरीदरम्यान नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 10:47 IST

तिरुपती मंदिर परिसरातील चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्या भाविकांप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे...

आंध्रप्रदेशातील 'तिरुपती विष्णू निवासम' या निवासी परिसरात बुधवारी (९ जानेवारी) रात्रीच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. या दुर्गटनेत ६ भाविकांचा मृत्यू झाला तर ४० जण जखमी झाले आहेत. वैकुंठ द्वार येथील दर्शनाचे टोकन मिळविण्यासाठी येथे भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी हा प्रकार घडला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, टीटीडीचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी संबंधित घटनेसंदर्भात माध्यमांना माहिती दिली आहे.

काय म्हणाले टीटीडीचे अध्यक्ष बीआर नायडू? चेंगराचेंगरीच्या घटनेसंदर्भात माध्यमांसोबत बोलताना टीटीडीचे अध्यक्ष बीआर नायडू म्हणाले, "ही एक दु:खद घटना आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अधिकाऱ्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. काही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तिरुपतीला भेट देणार आहेत. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतील. उत्सवादरम्यान अशी घटना घडणे दुर्दैवी आहे. वैकुंठ एकादशी दर्शनाच्या व्यवस्थेबाबत मुख्यमंत्री गंभीर आहेत आणि त्यांनी अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे."

चेंगराचेंगरीच्या कारणासंदर्भात बोलताना नायडू म्हणाले, "रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर, संबंधित महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी दारवाजा उघडण्यात आला. दरवाजा उघडताच चेंगराचेंगरी झाली."

PM मोदींनी व्यक्त केलं दु:ख - तिरुपती मंदिर परिसरातील चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्या भाविकांप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर त्यांनी म्हटले आहे, "आंध्र प्रदेशातील तिरुपतिमध्ये घडलेल्या चेंगराचेंगरीमुळे दुःखी आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले, माझ्या सहवेदना त्यांच्यासोबत आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो"

जखमी रुग्णालयात दाखल -या दुर्घटनेनंतर, ४० जखमींपैकी २८ जणांना रुईया रुग्णालयात, तर १२ जणांना सीआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने ४ भाविकांचा रुईयामध्ये आणि २ भाविकांचा सिम्समध्ये मृत्यू झाला. मृतांमध्ये ५ महिला आणि १ पुरूषाचा समावेश आहे.

वैकुंठ एकादशीचा कार्यक्रम - मिळालेल्या माहितीनुसार, १०-१९ जानेवारीदरम्यान वैकुंठ दर्शन सुरू होणार आहे. या कालावधीत लाखो भाविक दर्शनासाठी तिरुपती मंदिरात येतील. यासाठी तिरुपती मंदिर ट्रस्टने संपूर्ण तयारीही केली आहे. टीटीडीने गुरुवारपासून तिरुपतीमधील ९ केंद्रांमध्ये ९४ काउंटर्सवर वैकुंठ द्वार येथील दर्शनाचे टोकन देण्याची व्यवस्था केली आहे. 

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटAndhra Pradeshआंध्र प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीDeathमृत्यू