शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

धोका दिसताच 'प्रज्ञान' बनलं 'रजनीकांत', मारली अशी स्टाईल..! चांद्रावरून आला जबरदस्त VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 16:39 IST

Chandrayaan 3 : या व्हिडिओमध्ये रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर गोल-गोल फिरताना दिसत आहे...

इस्रोचे चंद्रयान मिशन-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अपले काम करत आहे. चंद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर आपले संशोधन करत आहे. यातच इस्रोने (ISRO) प्रज्ञान रोव्हरचा एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर गोल-गोल फिरताना दिसत आहे. तत्पूर्वी, चंद्रयान-3 मिशनच्या तीन उद्दीष्टांपैकी दोन उद्देश पूर्ण झाल्याचे इस्रोने म्हटले होते. ते म्हणजे, चंद्राच्या पृष्ठ भागावर सुरक्षित सॉफ्ट लँडिंग आणि चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हरची  भटकंती. तर, चंद्राच्या पृष्ठ भागावर वैज्ञानिक प्रयोगांशी संबंधित तिसरे लक्ष्य पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.

विक्रमला विचारून ठेवतोय पाऊल -विक्रम लँडरच्या चंद्रावरील लँडिंगनंतर, आता आपले रोव्हर प्रज्ञान भटकंती करत आहे. विक्रम आपल्या कॅमेऱ्याने रोव्हरचे फोटोही पाठवत आहे. प्रज्ञानच्या मूनवॉक करतानाचे फोटोही इस्रोने शेअर केले आहेत. आता, लँडर आणि रोव्हर यांच्यातील संवादासंदर्भात माहिती मिळाली आहे. हो, हे खरे आहे. लँडरमधून सुरक्षितपणे चंद्रावर उतरलेल्या प्रज्ञानने एखाद्या मुलाप्रमाणे, विक्रमला विचारले, 'मी मूनवॉकसाठी जाऊ शकतो?' इस्रोनेही हा संवाद देशवासियांसोबत शेअर केला आहे.

खड्ड्यांपासून असा करतोय स्वतःचा बचाव - प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर हे प्रत्येक गोष्ट आपसात बोलून करत आहेत. हे ऐकायला आपल्याला नक्कीच थोडे विचित्र वाटेल, पण आपल्या वैज्ञानिकांनी यांची निर्मिती अशाच पद्धतीची केली आहे. चांद्रावरील मोठ मोठ्या खड्ड्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी रोव्हर सेंसर्सची मदत घेतो आणि असे काही आढळल्यास आपला मार्ग बदलतो.

यापूर्वी फोटो शेअर करत इस्रोने माहिती दिली होती की, "27 ऑगस्ट रोजी चंद्रयान-3 मोहिमेतील प्रज्ञान रोव्हर त्याच्या स्थानापासून 3 मीटर अंतरावर असलेल्या मोठ्या खड्ड्याजवळ पोहोचले होते. पण, नंतर रोव्हरने सुरक्षितपणे नवीन मार्ग निवडला."

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3isroइस्रो