आर्यनंदी महाराज जयंती उत्सव
By Admin | Updated: March 21, 2015 00:24 IST2015-03-20T22:39:34+5:302015-03-21T00:24:17+5:30
नाशिक : दिगंबर जैन सैतवाळ मंडळतर्फे आर्यनंदी महाराज यांचा १०८वा जयंती उत्सव १५ मार्च रोजी नाशिक येथे साजरा करण्यात आला. यानिमित्त आचार्य श्रींचे संगीतमय पूजन व शिखरजी विधान संपन्न करण्यात आले.

आर्यनंदी महाराज जयंती उत्सव
नाशिक : दिगंबर जैन सैतवाळ मंडळतर्फे आर्यनंदी महाराज यांचा १०८वा जयंती उत्सव १५ मार्च रोजी नाशिक येथे साजरा करण्यात आला. यानिमित्त आचार्य श्रींचे संगीतमय पूजन व शिखरजी विधान संपन्न करण्यात आले.
पूजा विधानाकरिता भुसावळचे पंडित प्रवीण मुळकूटकर यांना पाचारण करण्यात आले होते. या कार्यक्रमाकरिता प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डॉ. गजकुमार शहा, इतिहासाचे अभ्यासक व तज्ज्ञ यांना निमंत्रित करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष दीपक प्रभाकरराव काळे होते. दर वर्षीप्रमाणे या वर्षीचा समाजभूषण पुरस्कार छबिलदासजी व सौ. विमल आंबेकर यांना रमेश व सौ. नलिनी हनमंते यांच्या हस्ते देण्यात आला. मान्यवरांना मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अतुल संगवे यांचा सुद्धा विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सौ. स्वाती माडिवाले व आभारप्रदर्शन नीलिमा अवथनकर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता अरुण भागवतकर, विनोद माडिवाले, सतीश मुद्दलकर, नितीन ओझरकर, स्वाती माडिवाले, सुलभा काळे आदिंनी प्रयत्न केले.
(फोटो स्कॅनिंगला दिला आहे.)